पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

वसंत आला

वसंत पंचमी निमित्ताने रचना

*वसंत आला वसंत*

वसंत आला वसंत आला
शिशिर ऋतुतील वसंत आला
पिवळ्या फुलांचा सण आला
सर्वाना पहा आनंद झाला

वसंत ऋतू आहे ऋतूंचा राजा
नृत्य करत वाजवितात बाजा
आज सरस्वतीचा जन्म झाला
वसंत आला वसंत आला

ऋतूमागे ऋतूचक्र चालती
प्रत्येक ऋतूची वेगळी महती
थंडी संपली उन्हाळा लागला
वसंत आला वसंत आला

नवीन पिके येतात घरी
त्याची पूजा करे कारभारी
नैवेद्य दाखवितात देवाला
वसंत आला वसंत आला

झाडाला फुटती नवी पालवी
कोकीळ गातो मंजुळ गाणी
नवे रूप मिळते निसर्गाला
वसंत आला वसंत आला

गंध सुटला बघ चोहीकडे
डोळे अलगद वळती तिकडे
आंबा पहा कसा मोहरला
वसंत आला वसंत आला
सर्वाना पहा आनंद झाला

- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू