पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

नृत्या

शेवटी तिला सहन झाले नाही व तिने स्वतःच्या कान वर हात ठेवले व किंचाळली. स्वयंपाकघरात काम करत असलेली मृणालिनी धावत नृत्या जवळ आली व तिला छातीशी कवटाळले.

 

                नृत्या खूपवेळ रडत राहिली, थोड्यावेळाने ती मृणालिनीला म्हणाली,"आई, आता सहन होत नाही, त्या पेक्षा डॉक्टर काकांना सांग मला विषाचे इंजेक्शन द्यायला." असे म्हणून तिने स्वतःच्या गमावलेल्या पायांकडे बघितले.

 

                पाणावलेल्या डोळ्यांनी मृणालिनीने नृत्याकडे बघितले. तिला तिचा त्रास कळत होता पण ती काय करू शकणार होती!

 

                नृत्याला नृत्याचे वरदान होते. ती सहा वर्षाची असतानां च तिने मंचावरती डान्स केला होता आणि तिचे नाव नव्या मधून नृत्या करण्यात आले. ती म्हणजे नृत्याची देवी होती. अवघ्या दहा वर्षाच्या वयात ती शास्त्रीय नृत्यात प्रवीण झाली. नृत्य हे नृत्याच्या जीवनाचे अभिन्न अंग झाले. सोळा वर्षाच्या वयात ती सगळी कडे 'डान्सगुरु' म्हणून प्रसिद्ध झाली. वेगवेगळ्या शहरात तिचे डान्स शो होऊ लागले. तिचे स्वप्न होते स्वतःची डान्स एकेडेमी उघडायचे.

 

                पण एक दिवस कार्यक्रमातुन परतताना तिला अपघात झाला व त्यात तिने स्वतःचे पाय गमावले. ती झोपत असतांनाच शांत राहायची बाकी वेळ ती अचानक किंचाळायची.

 

                शेवटी मृणालिनीने एक निर्णय घेतला व नृत्याला म्हणाली,"तुझे स्वप्न होते ना डान्स एकेडेमी उघडण्याचे, तर समज कि डान्स एकेडेमी सुरू झाली व मी तुझी पहिली शिष्य. मी डान्स शिकेन तुझ्याकडून."

 

                ती चाळीशी ओलांडलेल्या आई कडे बघू लागली. पण तिला एक कारण मिळाले होते जगण्याचे. ती मृणालिनीला डान्स शिकवू लागली.

 

                फक्त दीड वर्षात मृणालिनी नृत्यात प्रवीण झाली. नृत्याला वाटायचे के नृत्य हे तिला ईश्वराकडून मिळाले आहे पण आता तिला कळले कि नृत्य हे तिला आई कडून मिळाले आहे.

 

                आज मृणालिनीचा पहिला शो होता व नृत्या जयपूर फूट घालून तो बघायला आली होती. मंचावर मृणालिनीचे नृत्य आणि प्रेक्षकांच्या टाळ्याचा गाजर ऐकून तिचे कां तृप्त झाले व तिच्या चेहेऱ्यावर स्मित रमले.  


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू