पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्रेमा तुझा रंग कसा ...?

ती पहिली नजरानजर

तो हृदयात वाजलेला गजर

ते पहिले बोलणे

आणि मग वळून वळून पाहणे ...


होते मग वारंवार भेट

कधी तो तर कधी ती लेट

शब्द गोठतात दिसताच समोर

मनात नाचतात नसलेले मोर ...


शब्द वाढताच झाला मग संवाद

थोडासा रुसवा आणि वादविवाद

मग ती मनवण्याची कसरत

आणि ते गोड हसू राग विसरत ...


आता प्रेम व्यक्त करण्याचा क्षण

हो म्हणेल की नाही हा मनात पण

विचारणार कस याची जीवाला घालमेल

प्रेम व्यक्त करणं मला कस जमेल ....?


शेवटी झालंच एकदाच बोलणं

ठरलंच होत हे नातं जुळण

आता ते जपण्याचा घेतलाय वसा

पण अजूनही कळत नाही

प्रेमा तुझा रंग कसा ?

प्रेमा तुझा रंग कसा ...?

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू