पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्रेम

प्रेम! प्रेम !प्रेम!

प्रेम हे कुणीही कराव! कुणावरही कराव!

व्यक्तीवर, नात्यावर, पशुपक्ष्यांवर, पाना फुलांवर, रानावनावर, समुद्रावर, आभाळावर, चांदण्यावर, सूर्यावर, अगदी, कशाकशावर हि ...!आणि कुणीही करावं ...! प्रेम ...!

स्थळ-काळ-वेळ या सर्व बंधनांपासून मुक्त होऊन, कुठेही कोणीही, कोणावरही, कोणत्याही क्षणी करावं प्रेम ...!

प्रेम म्हणजे नक्की काय?

अनेकांनी शोधलं, प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने जगासमोर मांडलंही....! पण प्रेमाची पूर्ण सर्वसमावेशक व्याख्या आजपर्यंत तरी कोणालाही सांगता आले नाही.

मुल आणि आई, देव आणि भक्त, प्रियकर आणि प्रेयसी, हे प्रेमाचे उच्चकोटीचे उदाहरण असले, तरीही, मानवाने पशुपक्ष्यांवर किंवा पशु पक्षांनी मानवावर केलेले प्रेम हे ही प्रेमाच  असत ना?

पहाटेच्या वेळी, कोवळी सूर्यकिरणे अंगावर घेत बसलेलं असतांना; त्या किरणांनी, दवबिंदू चमकताना बघून; मनामध्ये तो आनंद निर्माण होतो तेही प्रेमच! किंवा, शांत, निवांत रात्रीच्या वेळी, चांदण्या मध्ये एकट्याने बसून; आकाशातल्या त्या नक्षत्रांच्या लुकलुकण्यात, स्वतःचं अस्तित्व विसरून जाणं ही प्रेमच असतं! सहज वावरत असताना, एखाद्या गुलाबाच्या काठीवर उमललेले ते मोहक गुलाबाचं फुलं बघून; त्याला स्पर्श करण्याचा भाव मनात निर्माण होतो ना, ते ही प्रेम असतं ...! मऊमऊ गवतावरून चालत असताना; त्याचा पायाला होणारा तो अलवार स्पर्श, हवाहवासा वाटणं हे प्रेम की हो ...! रणांगणावर शत्रूशी लढत असणारा  सैनिकही, करतोच ना प्रेम, आपल्या मातृभूमीवर; आणि लढताना येणाऱ्या विरमरणावरही ...!

ह्या सर्व उदाहरणांमध्ये असलेलं प्रेम, हे अल्प काळ टिकणार आहे; म्हणून ते प्रेम नाही! असं आपण म्हणू शकतो का? नाही..! नक्कीच नाही..! कारण, प्रेम .. हे प्रेमच असतं ... !

खरोखर प्रेमाला शब्दांमध्ये बांधणं एवढं सोपा आहे? सहज शक्य आहे?

अगदी धुळीच्या काणांपासून, ब्रम्हांडापर्यंत, चराचरात व्यापलेलं हे प्रेम; कुठेही, कधीही, शोधलं तर अगदी सहज सापडतं ...! मग खरोखर त्याला चार शब्दांत व्यक्त करणं कसं शक्य आहे बरं !

प्रेम हे अफाट आहे ...!अथांग आहे ...! अनंत आहे ...! सर्वस्पर्शी आणि सर्वसमावेशक आहे. कदाचित, म्हणूनच त्याला परमेश्वर  म्हणत असावेत! हे सगळं जरी असलं ना, तरी, प्रेम म्हणजे, फक्त आणि फक्त प्रेमच असतं; एवढं मात्र नक्की ...!


©® दिपक सुर्यकांत जोशी

चिखली, जि.:- बुलढाणा

9011044693




पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू