पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

instawali

माझ्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाची गोष्ट खान, पिन आणि राहाण याबरोबरीने लागणारी इंस्टाग्राम..

म्हणजे मी माझ आयुष्य इंस्टा साठीच जगतो कदाचित.. ते स्क्रोल केल्याशिवाय मला श्वास घेतला आहे अस वाटत च नाही.. माझ आणि माझ्या इंस्टा च एकंदरीतच मस्त चालल होत.. मी फार पोरींसोबत चॅट करायचो अस नाही.. पण झाल्या होत्या ऑनलाइन ओळखी.. आणि काही ऑनलाइन मैत्रिणी पण होत्या.. चांगल जमायचं माझ त्यांच्यासोबत..

   कॉलेज लाइफ आणि इंस्टा लाइफ या मध्ये फक्त कमी एकाच गोष्टी ची होती मला कोणी गर्लफ्रेंड नव्हती.. जिला घेऊन मला कॉलेज मध्ये मिरावयच होत.. तिच्यासोबत रोज इंस्टा स्टोरी टाकायची होती.. तिच्या फोटो ला रोज शोधून शोधून गाणी टाकायची होती.. #couplesgoals#bae#mybea#mylifeline हे सगळेच हॅशटॅगस् तिची वाट बघत होते माझ्या प्रोफइल वर..

   आणि एकदिवस माझ इंस्टा च माझ्यासाठी tinder बनल.. मला एक फॉलो रिक्वेस्ट आली.. आय डी नक्की कळेना.. mystery girl असा होता.. मला शौक च होता mystery सोडवण्याचा.. मी हि accept केली.. तीला फोल्लो back केल..

  थोड्या वेळात तिने हि रिक्वेस्ट accept केली.. बरेच फोटो होते तिचे.. मी एक दोन लाइक हि केले.. त्याच्या हायलाइटस चेक केल्या.. नॉर्मल profile होत.. जस बाकी मुलींच असत तसच.. मला वाटल मी सोल्व्ह केले mystery.. पण खरी mystery तर आता सुरु झाली होती..

  माझ्या इंस्टावालीची mystery....

थोड्या दिवसात आमच चॅटिंग सुरु झाला.. म्हणजे अगदीच लगेच अस नाही ह. ते typical “जेवलीस का”

 तर अजिबात नाही.. ती स्टोरी ला रिप्लाय द्यायची माझ्या.. म्हणजे ते हि फक्त इमोजी ने.. मी ती लाइक करायचो तिच्या मेसेजेस ना.. कधी कधी मी हि तिच्या स्टोरी ला रिप्लाय द्यायचो मग ती लाइक करायची.. अस सगळ छान सुरु होत.. म्हणजे मला काही घाई नव्हती तिच्याशी गप्पा मारायची.. पण का कोण जाण मी अधून मधून तीच प्रोफाईल चेक करायचो.. तिचे तेच तेच फोटो पुन्हा पुन्हा पाहायचो.. का याच कारण मला हि माहिती नव्हत..

   असच करत करत तीचा माझ्या एका स्टोरी ला रिप्लाय आला.. आणि मी मेसेज नुसत लाइक न करता तिला डायरेक्ट hii अस टाकल..

  दोन मिनिट मध्ये तिचा रीप्लाय आला..

“hii”

“kay kartes..”

“kahi nahi tu bol..”

“kahi nahi..  kutlya clg la ahes??”

“kutlyach nahi..”

“mhnje??”

या नंतर ती काही बोलली नाही.. मला च कळेना मी अस काय विचारल.. त्यानंतर ती दोन दिवस active हि नव्हती.. माझ्या मनात मात्र थोडी बैचीनी होती.. माहिती नाही कसली ते..

  मी mystery मध्ये अडकायला सुरु झालो होतो कदाचित..

दोन चार दिवसांनी तिचा मेसेज आला. आणि मी हि लगेच रिप्लाय केला. ती अशी का वागली याच उत्तर हव होत मला.. का अस बोलन अर्धवट सोडलं तिने हे विचारायचं हो मला.

   पण तिने मला त्या अर्ध्या राहिलेल्या बोलण्याच कारण दिल..

की ती बिझी होती म्हणे.. आणि तीचा सध्या educational gap  आहे.. त्यामुळे ती कोणत्याच कॉलेज ला नाही..

  अस करत करत आमच मस्त चॅटींग सुरु झाला.. मला पाहिला थोड खटकायच तिच लेट रिप्लाय करण पण मग नंतर सवय च झाली.. ती इंस्टा फार युज करत नाही हे एकंदरत माझ्या लक्षात आला होता.. पण जेंव्हा केंव्हा active असायची तेंव्हा माझ्यासोबतच बोलायची.. म्हणजे पटपट रिप्लाय द्यायची..

बोलता बोलता महिना होऊन गेला.. आता वेळ आली होती आमचे फोन नंबर एक्चेंज करायची.. मी एकदा दोनदा तिचा नंबर बहाणे करून मागितला तर तिने नाही दिला.. आज मात्र ठरवलच होत की काही होऊदेत डायरेक्ट नंबर मागायचा.. कुठेतरी मला पण तिच्या बद्दल सोफ्ट फीलीन्ग्स आल्या होत्या.. तिच्याबद्दल जेवढ कळल आहे त्यपेक्षा जास्त जाणून घ्यायचं होत..

  मला इंस्टा वर काही वेळ नाही पण तिच्यासोबत दिवसभर हव तेंव्हा गप्प्पा मारायच्या होत्या.. हव तेंव्हा तिला फोन करायचा होता.. तिला व्हिडीओ कॉल करायचा होता.. मी या सगळ्याला प्रेम म्हणत नव्हतो पण हो मला अस सगळ हव होत अगदी असच..

मी तिला खूप धाडस करून मेसेज केला..

“तुझा whatsapp नंबर दे”

तिने थोड्या वेळाने मला तिचा नंबर पाठवला.. मी लगेच सेव्ह केला.. आणि तिला whatsapp ला मेसेज देखील केला.. आता मला खात्री पटली होती की माझ्या बाकी मैत्रिणींसारखीच जेन्युअन आहे..

 

 

  हल्ली मला तिच्या या वागण्याच इरीटेशन होत होत.. म्हणजे फोन वर बोलन नाहीच दर वेळी कारण आई बाबा आहेत, बाहेर आहे, चार्जिंग च नाही.. सगळी पॉसिबल कारण देऊन झाली होती.. मी हि हट्टाला पेटलो होतो.. मला बोलायचं च होत.. काही करून तिचा आवाज ऐकायचा होता..

  माझ्या मनाच्या एका कोपर्यात जी एक छोटीशी भीती होती तिच्या बद्दल, तिच्या अकाउंट बद्दल ती सारी खोटी ठरावी म्हणून एकदा एकदा बोलायचं होत तिच्यासोबत..

   पण ती काही करून बोलायला तयार म्हणून नव्हती.. का माहिती नाही.. मी तिला मेसेज करू नको म्हणाल्या नंतर तिने खरच मला मेसेज केला नाही.. मी हि दोन दिवस बोललो नाही.. पण आता मात्र माझे पेशन्स पूर्णपणे संपले.. मी तिला शोधून काढायचं ठरवल..

  माझ फेसबुक अकाउंट नव्हत.. मी त्या रात्री बसून आधी अकाउंट काढला.. आणि तीच नाव सर्च केल.. नाही मिळाली.. खूप सर्च केल.. वेगळ्या वेगळ्या नावाने... पण नाही..

  आता माझ्याकडे लास्ट option  राहीला होता.. तिच्या इंस्टा ला जाऊन तिच्या फोल्लोवर्स मध्ये कोणाकडे तरी तिची चौकशी करायची..

  या गोष्टी मुळे तिला वाईट नक्की वाटल असत पण नंतर समजावले असते.. सो मी तिच्या इंस्टा फोल्लोवर्स मध्ये तिची कोणी मैत्रीण भेटते का बघत होतो..

  तिच्या बर्याच फोटो वर कमेंट असलेली अशी एक मुलगी फायनली मला सापडली.. तिला मी पहिला फोल्लो केल.. तिने माझी रिक्वेस्ट accept करायला च दोन दिवस घालवले.. जे काम मी एका रात्रीत करायचं ठरवलं होत त्याला एक एक दिवस वाढत च चालला होता.. आणि mestary सुटायला रोज एक दिवस लेट होत होता..   

    तिने रिक्वेस्ट accept केल्या केल्या मी मेसेज केला.. त्यावर तिचा लगेच रिप्लाय आला अस नाही.. तो रिप्लाय करायला सुद्धा तिने दोन ते तीन दिवस घालवले.. इकडे माझे विचार तिसऱ्याच दिशेला चालले होते.. फायनली तिचा मेसेज आला..

   तो वाचल्या वाचल्या मी लगेच रिप्लाय केला..

" तू पूर्वा पाटील ला ओळ्खतेस का..??"

"हो का..??" ती म्हणाली..

"मला तिच्याबद्दल थोडं बोलायचं होत.."

"काय..??"

"ती माझी मैत्रीण आहे.. मी खूप मेंटली invlove आहे तिच्यात.. पण हल्ली ती विचित्र वागत आहे.."

"तू कधी पासून ओळ्खतोस तिला.."  ती म्हणाली..

"हल्ली च एक महिना झाला.."

"काय कस शक्य आहे..??"

"का..??"

"She is no more.. चार महिने झाले.. आणि तू म्हणतोस तुम्ही बोलता कस शक्य आहे.."

 

  यावर मी तिला काहीच रिप्लाय दिला नाही.. आणि देणार तर काय होतो..?? माझ मलाच कळत नव्हत.. सगळ्या गोष्टी मध्ये एक गोष्ट अनुउत्तरीत होती की मला मेसेज येत कुठून होते..?? मला ते चॅट उघडून हि बघायचं ही धाडस झाल नव्हत.. मी फोन तसाच धरून बेड वर बसून होतो.. काय करणार होतो मी.. अजून हि कळत नव्हत..

   त्या मुलीचा म्हणजे पूर्वा च्या मैत्रिणी चा मला पुन्हा मेसेज आला..

“nkki sangashil ka mla.. kay zalay te..?? ”

“mhnje kay mesej alet tula mla plz sangshil ka..??”

 मला मात्र काय करायचं हेच कळत नव्हत.. कोणाला सांगू..?? भितीन गार पडलो होतो.. थोड्या वेळाने मी तिला मेसेज केला..

“ho.. mi tula ss takato.. mla hi kalena.. ”

 अस म्हणून मी तिला सगळे स्क्रीन शॉट तिला पाठवले..

तीचा मला मेसेज आला.. ज्या मध्ये तिने मला तिचा नंबर दिला होता आणि त्यावर call कर अस सांगितलं होत..

मी call केला..

“हाय.. मी सुमित बोलतोय..”

“हाय.. मी आकाशी.”

“बोल न call कर म्हणाली होतीस..”

“हो मी बघितले तू पाठवलेले ss.. मला हि shock बसला..”

“काय करायचं पुढे..???”

“हे बघ मला अस वाटतय कि पूर्वी चा फोन युज करत आहे कोण तर..”

“म्हणजे??”

“म्हणजे.. तिच्या फोन वरून तुला कोणीतरी मेसेज करतय..”

“कळणार कस पण..??”

“मी तिच्या घरी call करून बघते..”

“हा.. चालेल.. मला कळव..”

“हा हो..”

 अस म्हणून तिने call कट केला.. मी मात्र अजुनी घाबरलेलोच होतो..

   थोड्या वेळाने तिने call केला तेव्हा कळल की तिचा लहान भाऊ मला मेसेज करायचा.. तिच्या account वरून.. तिचा फोन तिच्याकडे होता.. हे ऐकून मला हसू कि रडू हेच कळेना..

  या प्रकरणाने मला मात्र आता insta वर अनोळखी पोरींसोबत बोलायची भीती बसली होती.. मी जवळपास पोरींसोबत बोलन च सोडलं होत.. यात एक मात्र चांगल झाला होत कि आकाशी सारखी चांगली मैत्रीण मला भेटली होती..

  मला खरच वाटल नव्हत कि माझ्या इंस्टावाली ची mestery अशी कायतर सोल्व्ह होईल.. मी ते account ब्लॉक नव्हत केल.. थोड्या दिवसांनी ते दिसायचं बंद झाला.. यावरून कळल की ते account deactivate झालाय..

    काय अजून काय वाट बघताय.? तुम्हला काय वाटल भूत?? नाही नाही तस काही नाही.. पण तुमच्यासोबत खोट नाही बोलणार मला हि सुरवातीला असच वाटल होत.. म्हणून तर घाबरलो होतो ना. यापुढे मात्र मी हि ध्यानात ठेवणार आहे आणि तुम्ही हि ठेवा... काय ते कळल असेल तुम्हाला....

समाप्त




पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू