पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

हो ना रं बाबा आता तुच तुझा सूर्य

हो ना रं बाबा आता तुच तुझा सूर्य

आता कुणावरच ठेवु नका हो भरोसा
कोणतंच सरकार नाही गड्या आपलं
सरकार अन् विपक्ष एकाच माळेचे मणी
नुसत्या आश्वासनाच्या खेळतात खेळी

कांग्रेस अन राष्ट्रवादी चांगलं नाही
काहीच भरतीच काम केलं नाही
आणला मग हिंदू आभासी राष्ट्रवादी 
पवित्रतेचं पावित्र्यचं जपलंच नाही
जाब विचारला तर बनवलं देशद्रोही

ठरवलं बहुमत कुणाला नाही द्यायचं
अन् याच उघड्या डोळ्यांनी पाहिली
अर्ध्या रात्रीची शपथविधी अन् फारकत
एकाच क्षणात परंपरागत मित्र बनले शत्रू
अन् नवीन तिकडी सरकार यांनी बनवलं

पहिल्याचा रागाचा फायदा घेतला दुसर्यान
अन् दुसऱ्याचा फायदा घेतला या तिसऱ्यानं
बरं काही हरकत नाही आता तरी काम करावं
बघता बघता यांच्या कुरघोडीचं एक वर्ष सरलं 
टिव्हीवर जाहिराती आम्ही हे केलं अन् ते केलं

प्रश्न भरतीचा तसाच पडुन राहिला हाय
संस्था शिक्षणमहर्षींचा तोराच नवा हाय
अनुभव मिळतोय तोच लयी मोठा हाय
चपराश्यापेक्षा मास्तराचा दर कमी हाय
उच्च शिक्षित शांत गाढवचं पाहिजे राव

आता तन मन खरंच विद्रोही बनतयं 
उरात नीतीचं अनितीशी द्वंद्व चाललंय
जीवन बरबाद करून का बरं बसलायं
फुकाच्या तत्वज्ञानाचे दिप पाजळायं
मृतोपजीवी गिधाडं प्रतिक्षेत बसल्यातं
सज्ज हो ना सिंह बनुन तुटून पडण्यांस

सुशिक्षित बेरोजगारांना एकत्र करू
निर्माण करु भगत सुखदेव राजगुरू
केला आवाज बहिर्यांना ऐकविण्यास
मात्र आज त्यांसी कायमचं गाढण्यांस

किती दिस उद्याच्या खोट्या आशेवर
असंच चाचपडत जगणार आहेस
काळोख्या अंधाराला भेदायला
अजुन कोणाची वाट पाहणार आहेस
हो ना रं बाबा आता तुच तुझा सूर्य 
बघ उद्या लवकरच उजाडणारं हाय

- गोपाळ लक्ष्मणराव सूर्यवंशी पाटील

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू