पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

जय जय रघुवीर समर्थ

श्रीराम तेज सामावलेले जयांत |

उपासना जयांची असे अशी समर्थ |

रामदासी जयिष्णूचा घोष घेई राष्ट्र |

घोषणाच ज्यांची 'जय जय रघुवीर समर्थ' ||

 

राष्ट्रकारणा हनुमान बलोपासना देत |

शिव स्वराज्यासही जे देती सामर्थ्य

'उपासनेला दृढ चालवावे' सांगत |

मठ स्थापनेतूनी जे साधती परमार्थ ||

 

साहित्यरचनांतूनी बोध देत |

दासबोधातूनी जे समजावती जीवनार्थ |

मनाची शते सांगूनी खणखणीत |

महाराष्ट्र धर्म जागविती जे यथार्थ ||

 

भाग्यच, जन्म अशा महाराष्ट्रात |

प्रणाम त्यांना जयिष्णू योगदानाप्रीत्यर्थ |

प्रेरणा घेऊन त्यांच्याकडून उपासनेची नित |

जागवूया तेज स्वतःत, स्व-विश्वकल्याणार्थ ||

|| जय जय रघुवीर समर्थ ||

©सौ. पूनम राजेंद्र. 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू