पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

थोडं स्वतःसाठी जग

विचार नको करूस काय म्हणे जग

   वेळ थोडा काढ आता स्वतःसाठी जग


लग्नानंतर संसाराला घेतलं असशील जुंपून

  कुटुंब आणि ऑफिसातच जग गेलं  संपून

स्वतः स्वतःला आठवून  एक दिवस बघ

वेळ थोडा काढ आता स्वतःसाठी जग



 मुलांचा अभ्यास, सासूबाईंची पुजा

 रोजचा स्वयंपाक यात वेळ पडतो खुजा

 छंद कुठले होते ते तरी आठवून बघ

वेळ थोडा काढ आता स्वतःसाठी जग



 फार काही अंतर नाही तुझ्यात  आणि बैलात

 संसाराच्या रहाटगाडग्यात बायकाचं  फसलात

 एक दिवस कंपल्सरी आळस काढून जग

वेळ थोडा काढ आता स्वतःसाठी जग




 मुलं मोठी होऊन त्यांच्या बायका पोरात  रमतील

तूच तुझ्या सोबत आणि नवरोबा उरतील

मुलांच्या अभ्यासात विसरली होती स्वतःचं जग

 थोडा वेळ काढ आणि स्वतःसाठी जग 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू