पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मराठी माझी

नवनवोन्मेषलिनी l सृजनशील अविष्करिणी l

संस्कृती जन्मदायिनी | मराठी माझी ||


पालक तिची देववाणी | साहित्य  अमृतवाणी 

अभंगवाणी,पोवाडे, लावणी | अविष्कार साजरा ll


वृत्तांताची रेलचेल | छंद चपल l

मात्रा चपखल | व्याकरण संपन्न |


प्रणय युगुल गीत | किंवा नाट्यगीत |

वीररस समरगीत | दर्जेदार 


शब्दसंपन्न गोविंदाग्रज | प्रतिभाशाली कुसुमाग्रज 

माडगूळकर पाडगावकर | शिरपेच मानाचे |


कित्येक शतके  मिरविली 

कित्येक स्थित्यंतरे  पचविली 

अंगाई ते दंगलगाणी रुजविली 

मराठी माझी 


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू