पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मराठी स्वागतस्वर

साडी अशी नऊवार

काठात सुवर्णी जर

पैठणीच्या पदरात 

नाचे हासरा गं मोर    ||१


नथ अशी मोतीदार

भाळीची गं चंद्रकोर

मंगळसूत्राचे मणी

रोखती काळी नजर  ||२


सदरा आणि धोतर

फेटा पहा आबदार

वहाणेची करकर

सुहास्ये नमस्कार      ||३


अंगपिंड पिळदार 

करडी असे नजर

सज्जनास दे आदर

शत्रुस ती ठेवी दूर      ||४


महाराष्ट्र देशावर 

शालिन तिचा वावर 

सावध आणि सादर 

मराठी स्वागतस्वर     ||५


समृद्ध शब्दभांडार

श्रीमंती ती वाणीवर

आरं ला विचारे कारं

अंतरात ज्ञानेश्वर        ||६

शब्द © सौ. पूनम राजेंद्र.


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू