पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मराठी

म्हणे मनाची वीण मराठी

मग का झाली क्षीण मराठी?........


संस्काराची जाण मराठी

अन् ज्ञानाचे दान मराठी

अभंगांची तान मराठी

संतांचा अभिमान मराठी

मग का झाली क्षीण मराठी?........


अक्षरांचा भार मराठी

शब्दांचे भांडार मराठी

वृत्त अलंकार मराठी

अमृताची धार मराठी

मग का झाली क्षीण मराठी?........


दिन दिनातच दीन मराठी

आम्हीच करतो क्षीण मराठी

वर्षभर जागवीन मराठी

मुखातून सजवीन मराठी

होईल कशी मग क्षीण मराठी? .........

होईल कशी मग क्षीण मराठी? .........


©® दिपक सुर्यकांत जोशी

चिखली, जि :-बुलढाणा

९०११०४४६९३

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू