पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

द सेवेन्थ सिक्रेट

द सेवंथ सिक्रेट

लेखक - आर्यविंग वॉलेस.

अनुवाद - विजय देवधर...

प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस.

पुस्तक परिचय - प्रशांत गाडेकर.



        30 एप्रिल 1945. जर्मनीचा क्रूरकर्मा  हुकुमशहा अडॉल्फ हिटलर याने, आपल्या एक दिवसाची पत्नी इव्हा ब्राऊन हिला प्रथम सायनाईड दिलं आणि त्या नंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. कारण काय तर जगावर अधिराज्य गाजविण्याची महत्त्वाकांक्षा असणाऱ्या क्रूरकर्मा हिटलरला दुसऱ्या महायुध्दात आपला पराभव स्पष्टपणे दिसू लागला होता. मित्र राष्ट्रांच्या हाथी सापडून अपमानित होवून मरण्यापेक्षा त्याने स्वतःला व स्वतःच्या बायकोला संपवले. (मरण्यापूर्वी त्याने आपल्या कित्तेक वर्षा पासून प्रेयसी असलेल्या, इव्हा ब्राऊनशी तिच्या इच्छे खातर लग्न केले ही गोष्ट वेगळी.)

          पण त्याने खरंच आत्महत्या केली होती का? लाखों ज्यूं ची अमानुष हत्या करणारा, पाताळयंत्री खुनशी असा हा क्रूरकर्मा इतक्या सहज मृत्यूला सामोरा जाईल का? की त्याच्या मृत्यूचा एक अजबच बनाव रचला गेला होता? हे आणि  असे अनेक प्रश्न Harisan Hashcraft यांना पडतात. हे महोदय ऑक्सफर्ड युनव्हर्सिटीच्या एक कॉलेज मध्ये आधुनिक इतिहासाचे प्राध्यापक असतात. आणि हिटलरचं चरित्र, 'हेर हिटलर' लिहण्याचा त्यांचा मानस असतो. त्यासाठी ते आपली मुलगी एमलीला मदतीला घेतात. एमलीही इतिहासाची अध्यापक असते पण दुसऱ्या ठिकाणी....

        

        Harisan Hashcraft यांचं संशोधन सुरू असतं आणि ते लिहणार म्हटल्यावर सगळ्यांची उत्सुकता आधीच उंचावल्या असतात. Harisan Hashcraft कामाला लागतात आणि हिटलर ने ज्या 'फुरर बंकर' मध्ये शेवटचा श्वास घेतला, तिथल्या परिसराचं उत्खनन करण्याचं ठरवतात.  याकामी त्यांचे मित्र Blaunbakh त्यांना मदत करतात जे की मेयर असतात. Harisan Hashcraft यांच्या हिटलर वरील आगामी पुस्तकाची, 'हेर हिटलर' ची बातमी जगभर पसरली जाते.

 

          Harisan Hashcraft कामात गर्ग असताना त्यांना एक पत्र येतं. आणि पत्रात उल्लेख असतो की हिटलर विषयी विश्वासार्ह आणि सत्य माहिती हवी असल्यास खालील क्रमांकावर कॉल करा. Harisan Hashcraft लगेच कॉल करतात आणि त्या व्यक्तीशी बोलतात. 80 वर्षाचा तो इसम डॉ. मॅक्स थायल असतो, जो की हिटलरचा शेवटचा दंतवैद्य असतो. डॉ. मॅक्स थायल सांगतात की त्या दिवशी हिटलरचा अंत झालाच नव्हता. त्याने,  इव्हा ब्राऊन आणि त्यांच्या पूर्ण टिमने पूर्ण जगाला गंडवल आहे. ते कदाचित आजही जिवंत असतील. माझ्या कडे तसे पुरावे आहेत. 30 एप्रिल 1945 नंतर ही मी कित्तेक दिवस हिटलर वर उपचार करत होतो. हिटलर वरील अगोदरच्या पुस्तकांपेक्षा, 'हेर हिटलर'  जास्त अचूक व्हावं अशी माझी इच्छा आहे म्हणून मी हे सगळी माहिती तुम्हाला देत आहे.

            ही सगळी माहिती ऐकल्यावर Harisan Hashcraft खूपच अस्वस्थ होतात. आणि खूप विचार करून ते डॉ. मॅक्स थायलला भेटतात..... त्यांच्या कडून अजुन माहिती घेतल्यावर ते ठरवतात की, डॉ. थायल सारखी अजुन बरीच लोकं अशी असू शकतात की जे हिटलर च्या सानिध्यात गुप्तपणे असू शकतील.... म्हणून ते अश्या लोकांनी स्वतःहून समोर यावं म्हणून पत्रकारपरिषद घ्यायचं ठरवतात. हा विचार ते एमलीला बोलून दाखवतात. तेव्हा ती, अजुनही दुसऱ्या शहरात असते. ती या गोष्टीला विरोध करते. पण Harisan Hashcraft ठाम असतात.

 

           Harisan Hashcraft पत्रकार परिषदेत जाहीर आवाहन करतात की, कोणी 30 एप्रिल 1945 नंतर हिटलरच्या संपर्कात राहिला असेल तर कृपया समोर यावं. पत्रकार परिषद संपल्यावर ते एका हॉटेल मध्ये जेवण करतात आणि रात्री हलकेसे आपल्या पुस्तकं विषयी विचार करत फिरत असतात आणि त्याच वेळी एक ट्रक त्यांना उडवून जातो आणि त्यातच त्यांचा अंत होतो.

 

         आता हिटलर वरील पुस्तकाचं काय होणार? हा प्रश्न सगळ्यांनाचं  पडतो. Harisan Hashcraft यांचा अंत्यविधी झाल्यावर काही दिवसांनी एमलीला एक पत्र येतं Blaunbakh यांचं. ते शोक व्यक्त करतात आणि ते पुस्तक 'हेर हिटलर' तिला पुढं लिहण्याची विनंती करतात. एमली ते आव्हान स्वीकारते. आता तिच्या समोर दोन प्रमुख आव्हाने असतात की हिटलर, इव्हा ब्राऊन यांनी खरंच आत्महत्या केली होती का? आणि आपल्या वडिलांचा खरंच अपघात झालाय का? की कोणी तरी मुद्दाम ठरवून त्यांचा खून केला आहे?

 

          Harisan Hashcraft यांचा खून झालाय हे थोडया तपासातच सिद्ध होत. एमली फुरर बंकर उत्खनन करायला सांगते. आणि ती अश्या सर्व ठिकाणी भेट द्यायला निघते जिथे हिटलर शेवटच्या काही दिवसात होता. तिला मदतीला तयार होतो तिचा मित्र फोस्टर.... ते खूप बारीक सारीक घटनांचा अभ्यास करतात.

        एका गावात त्यांना एका माणसा विषयी माहिती मिळते. जो की खूप चांगला मिमिक्री आर्टिस्ट होता. आणि तो दिसायला, चालायला एकदम हिटलर सारखा होता. कोणीही त्याला प्रथमदर्शनी हिटलरच म्हणत असे. पण तो हिटलरच्या मृत्यू आधी काही दिवस गायब झाला होता. ते आज पर्यंत त्याचा काहीच पत्ता नाही. असच एका स्त्री विषयी, जी इव्हा ब्राऊन सारखी दिसायची. तिचीही तीच कहाणी होती. एमली या निष्कर्षा पर्यंत येते की, फुरर बंकर मध्ये जे मृतदेह सापडले ते या दोन व्यक्तींचे होते....

 

       एका गावात एका वयोवृध्द इसमा जवळ तिला एक पेंटिंग सापडते... जे की हिटलरने काढल्या सारखे वाटत होते. (हिटलर लहानपणी चित्रं काढत असे आणि ती एका मित्रा बरोबर विकून चरितार्थ चालवत असे.) हिटलर च्या चित्राची सगळी वैशिष्टे त्या पेंटिंग मध्ये होती. एक तज्ञ ते चित्र तपासतो तर त्याला ही तेच वाटतं की हे हिटलर नेच काढलेलं पेंटिंग आहे. पण त्यावरील तारीख मात्र 30 एप्रिल 1945 नंतरची असते. यावरून Harisan Hashcraft आणि एमली यांचा अंदाज खरा ठरतो. म्हणजे हिटलर त्यानंतर काही वर्ष जिवंत होता.

 

       एमली आणि फॉस्टरच्या शोध मोहीम च्या काळात त्यांच्यावर हल्लेही होत असतात. पण त्या वरही मात करत एमली आपल्या ध्येया पर्यंत पोचते. अधिक माहिती घेतल्यावर हिटलर आता मृत पावला आहे हे लक्षात येतं. पण....

       पण इव्हा ब्राऊन अजुन ही जिवंत असते आणि तिला हिटलर पासून झालेली एक मुलगी सुद्धा असते, 'क्लारा'....अतिशय म्हातारी झालेली इव्हा ब्राऊन  आपल्या मुलीला क्लाराला जावून भेटते. क्लाराच ही लग्न झालेलं असतं.

 

      काय होत त्या माय लेकीच्या भेटीत? ती खरंच हिटलर ची मुलगी असते का? कसं जगतात त्या पुढचं आयुष्य? एमली हिटलर च्या मृत्यूच  सत्य समोर आणते का? Harisan Hashcraft यांचं स्वप्न, हिटलर वरील पुस्तक, 'हेर हिटलर' पूर्ण करण्याचं, ते एमली पूर्ण करते का?  की सत्याच्या खूप जवळ असताना एमलीचच काही बर वाईट होत? हे आपल्याला "द सेवेंथ सिक्रेट"  पुस्तक वाचून कळतं.

 

        अतिशय उत्कंठा वर्धक माहिती, चित्रमय भाषा आणि वेगवान थरारक घडामोडी. हे  मला या पुस्तकाचं वैशिष्ठ वाटतं. काल्पनिक असल्या तरी सर्व घटना अगदी सत्य आहेत, आणि त्या याच पद्धतीने घडत गेल्या असाव्यात हे वाचकांच्या मनावर बिंबवण्यात लेखक कमालीचा यशस्वी ठरला आहे. आणि यात विजय देवधर यांच्या अनुवादाचा ही तितकाच महत्वाचा वाटा आहे.  आपण परदेशी भाषांतरित पुस्तक वाचत आहोत, असे शेवटपर्यंत वाटत नाही.

           एखादं पुस्तक वाचून, त्याची ओळख करून देण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. मी तर असेच म्हणेन की मेहता प्रकाशनच "THE SEVENTH SECRET" हे पुस्तक प्रत्येकाने आवर्जून वाचावे.....

 

- प्रशांत गाडेकर. (PSG)

मोबाईल - 9833172642.

डोंबिवली (पूर्व)

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू