पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

वाचत सुटलो त्याची गोष्ट

"वाचत सुटलो त्याची गोष्ट"

लेखक - निरंजन घाटे.

समकालीन प्रकाशन.....


           नुकतंच निरंजन घाटे लिखित, "वाचत सुटलो त्याची गोष्ट" हे पुस्तक वाचलं. जे बऱ्याच दिवसां पासून वाचायचं होत. या पुस्तकाचे उपशीर्षक आहे,  'एका लेखकाच्या ग्रंथ वेडाची सफर'....

         

           घाटे सरांची १८० हुन जास्त पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. तरीही सर हे जाहीरपणे मान्य करतात की मी लेखका आधी वाचक आहे. आणि माझ्या वाचना मुळेच मी लेखक झालो आहे. सरांनी खूपच लहानपणा पासून वाचनाची सुरुवात केली. अगदी पाचव्या वर्षा पासून.... तिथून पुढे त्यांनी जो वाचनाचा सपाटा चालू केला तो ७० वर्ष अव्याहतपणे चालूच होता.....

            सरांना वाचनाचं वेड काय, व्यसनच लागलं, असं म्हणावं लागेल.... (हे चांगलं व्यसन मला लागावे, ही मनोमन इच्छा). जसं जसं वय वाढत चाललं, तस तसं त्याचं वाचन वाढतच जावू लागलं . आणि एकदा वाचनाची आवड निर्माण झाल्यावर ते, हाती मिळेल ते वाचू लागले.... पेपर, कागदाचा तुकडा, हिशोबाचे कागद, वाण सामान ज्यात गुंडाळला जातो तो कागद. इतकेच काय ते रिकाम्या वेळी कायम काही ना काही तरी वाचतच असत... मग ते कुठेही असले तरी.


            रेशनिंगच्या रांगेत,  तिकीटाच्या रांगेत, रिकामा फावला वेळ मिळाला की ते वाचतच सुटत. इतकं की त्यांना, काळ वेळ काय, तर तहान भुकेच ही भान राहत नसत....  वाचनासाठी त्यांना कोणताही विषय वर्ज्य नसे....त्यांनी अनेक कथा कादंबऱ्या, नियतकालिक मराठी व इंग्रजी भाषेतील वाचली.... नुसती वाचलीच नाही तर, वेळोवेळी त्यांचे टिपण काढणे, त्यावर लेख लिहणे , मित्रांशी चर्चा करणे हा उपक्रम त्यांचा नेहमी चाले.


           त्यांनी अनेक पुस्तके कशी मिळवली आणि त्यासाठी काय काय केलं याची गम्मत या पुस्तकात तुम्ही स्वतः वाचल्याशिवाय कळणार नाही. त्यांनी अनेक नवी पुस्तके विकत घेतली, पण त्याहुन जास्त त्यांनी दुर्मिळ आणि मौल्यवान अशी पुस्तके रद्दीच्या दुकानातून, फूटपाथ वरील पुस्तक विक्रत्यांकडून अगदी कमी किमतीत घेतली. (मी ही सध्या अश्याच प्रकारे पुस्तके घेत आहे) जगभरातील मोठ मोठ्या साहित्यकांची  पुस्तके त्यांनी वाचायला आणि संग्रही ठेवायला सुरुवात केली. नंतर नंतर ते विक्रतेच सरांची आवड पाहून त्यांच्या साठीची पुस्तके काढून ठेवू लागले. ते अश्या प्रकारची पुस्तके इतरांना देत नसतं.


           प्रचंड वाचन, प्रचंड चिंतन मनन केल्या नंतर, त्या त्या विषयांचा खूप अभ्यास केल्या नंतर त्यांनी पुस्तके लिहली. त्यांनी विपुल लेखन केलं असल  तरी, त्यांना विज्ञानकथा लेखक म्हणून लोक ओळखू  लागले.... पण विज्ञान कथे बरोबरच त्यांनी मानसशात्रावरही खूप पुस्तके लिहली.... तसेच स्त्री पुरुष नाते संबंध, त्यांचे sexual problem आणि सॅक्शुअल relationship  यावरही प्रकाश टाकणारी त्यांची पुस्तके आहेत.


           या पुस्तकात त्यांनी, त्यांच्या वाचन प्रवासाची सुरुवात कशी झाली, रहस्य कथांची ओढ कशी लागली, अचाट महिलांनी लिहलेली अफाट पुस्तके, वेग वेगळ्या प्रकारचे शब्दकोश, त्यांनी वाचलेली चरित्र  आणि आत्मचरित्र, आणि वाचलेल्या इतर पुस्तकांविषयी माहिती दिली आहे. जगभरातल्या उत्तम उत्तम ग्रंथांची माहिती आणि अनेक ग्रंथाचे संदर्भ आपल्याला या पुस्तकातून मिळतात.


           १८० हुन अधिक पुस्तके आणि ५००० हुन अधिक लेख, सरांची इतकी विपुल ग्रंथसंपदा आहे...


           आपण चार कथा लिहल्या आणि फेसबुक वर जगाला डोस देणाऱ्या चार ओळी खरडल्या, की लगेच आपण स्वतःला लेखक म्हणून समाजात मिरवून घ्यायला लागतो. (यात मी ही आहे.) पण आपण खरंच लेखक आहोत का? लेखक जाऊ द्या पण किमान आपण चांगले वाचक तरी आहोत का? हा प्रश्न मला  हे पुस्तक वाचून या क्षणी पडला. आत्मपरीक्षण करण्याची आणि वाचनाला अधिक गंभीरपणे घेण्याची गरज तीव्रतेने  वाटू लागलीय....


          खरंच ज्यांना जगभरातील उत्तम साहित्य वाचायचं आहे, वा त्या संदर्भात माहिती घ्यायची आहे त्यांनी, "वाचत सुटलो त्याची गोष्ट" ह्या ग्रंथ वेडाची सफर नक्कीच करावी.


- प्रशांत गाडेकर. (PSG)

Mobile- 9833172642.

डोंबिवली (पूर्व)


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू