पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

परिणाम

                     लघुकथा

                   *   परिणाम  *

                   "काय रे सुहास ! आला की नाही तुझ्या परीक्षेचे परिणाम ?" रमाच्या वडिलांनी खोचकपणे मला विचारले.

                   "नाही काका ! "

                   उत्तर देत मी गच्चीवरच्या माझ्या खोलीकडे पळालो. मला त्यांचे नंतरचे बोलणे टाळायचे होते. तीन वेळा परीक्षा देऊन झालीये ,अता का बर परत देतो परीक्षा, छान प्रायव्हेट नोकरी कर नाहीतर व्यापार कर.

                   खरंतर वैतागलो आहे सगळ्यांना उत्तर देत ,या वर्षी जर मी नापास झालो तर नक्की ते रमाच लग्न दुसऱ्या मुलाबरोबर लावून देतील , मागच्या वेळेस सिव्हिल सर्विसच्या इंटरव्यू मध्ये नापास झालो , पण यावेळेस मी नक्की पुढे जाणार.

                 "दादा ..सुहास दादा!" लीनाच्या हाकेवर मी भानावर आलो.

                " दादा आज रमाला पाहायला मुलवाले येणारे."

               "काय म्हणते?"

               "हो ! मी रमाला, साडीत एका मुलाबरोबर बाहेर जाताना पाहिल!" लीना एवढे सांगून परत गेली, मला एवढेच सांगायला आली होती.

                 रमाच बरोबर आहे, ती केव्हापर्यंत माझी वाट पाहणार ,लग्न न झालेल्या मुली आणि नोकरी नसणार्या मुलाची परिस्थिती फार काही वेगळी नसते ! प्रश्न पण सारखेच असतात ! 

मुलीला का गं केव्हा होणार दोनाचे चार हात ?

मुलाला काय ! मग केव्हा मिळणारे तुमच्या पगाराचे पेढे ? 

          आज सकाळपासून मोबाईल नाही पाहिला, अरे समीर चे मिस्ड कॉल आहे, आधी समीरला फोन लावतो.

             "काय झालं सम्या ?"

            " आहे कुठे तू ? केव्हापासून तुला फोन करतोय ! परीक्षेचा रिझल्ट आला आहे , तु पास झाला आहे मित्रा."

              " सम्या खरंच का?"

              " हो  ! अता जंगी पार्टी झाली पाहिजे."

               " समीर प्लीज कोणाला सांगू नकोस मी तुला तासभरात फोन करतो, ही परीक्षा मी पास केलीये , पण अजून एक परीक्षा राहिली आहे! "

                " कोड्यात बोलू नको काय झालंय?"

                " नंतर सांगतो!  "

           मी फोन कट केला,  तेवढ्यात रमा कार मधून उतरली, मस्त हसून त्या मुलाचा निरोप घेत ती तिच्या घरात गेली ! रमाच्या घरची आणि आमच्या घराची भिंत एकच आहे , आजपर्यंत आम्ही नकळत एकमेकाच्या घरच्या गोष्टी ऐकायचो ,आज मी मुद्दाम ऐकणार होतो.

                  "रमा कसा आहे मुलगा?" काकांचा आवाज आला.

                  "छान आहे बाबा!"

                  " मग पुढच्या गोष्टी करायच्या का ?"

                  "आई - बाबा तुम्हाला काही सांगायचं आहे."

                   "काय  ? " काकांचा अवाज .

                   "तुम्हाला दोघांना माहित आहे माझ आणि सुहासच  प्रेम आहे .आणि  मी ठरवल आहे लग्न त्याच्याबरोबरच करणार."

                    "सुहास ला नोकरी नाहीये , हा मुलगा छान प्राइव्हेट नोकरीत आहे ,सुखात राहशील, अजून विचार कर रमे !" काकू म्हणाल्या.

                    "मी त्या मुलाला माझ्या आणि सुहास बद्दल सांगितलं आहे ! "

                     मी आई-बाबांना  परीक्षेत पास झाल्याचे सांगितले .बाबा पेढे आणायला निघाले , आई देवघरात उभी होती .

                    "आणि मी ? "

                  मी रमाच्या घरच्या पायऱ्या चढत होतो, रमाच्या वडिलांना माझ्या दोन्ही परीक्षेचे परिणाम सांगायला जातोये , जे  शंभर टक्के माझ्या बाजूनी लागले आहे .

                   

                        मीनल आनंद विद्वांस

                       

     


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू