पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कविता

वृत्त - मंजुघोषा, मात्रा 21, 

 

लगावली - गालगागा गालगागा गालगागा

 

या नभाने या ढगाला दान द्यावे

पावसाने या धरेला दान द्यावे 

 

थांब थोडा या जगाशी मेळ आहे

मी जरासे ह्या कराने दान द्यावे

 

सोड आता वैभवाला व्यर्थ आहे

माणसाने माणसाला दान द्यावे

 

या ग्रहाचे त्या ग्रहावर पूल व्हावे

तारकाने चंद्रमाला दान द्यावे

 

ह्या मनाचे त्या मनाला थांग नाही

एकमेकांना जरासे दान द्यावे

 

वसंत वाघमारे

9767319615

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू