पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आत्महत्या

नको करु तू आत्महत्या

कारण ही तर जीवाची हत्या

आपल्या भावनांना आहे खुप किंमत

नकोस हारू तू हिंमत

दे जीवाला थोडा अवधी

नकोस होऊ तू अपराधी

नकोस घेऊ वरिष्ठांचं इतकं मनावर

ये थोडं भानावर

आता स्वतःला तू आवर

नको जाऊ देऊ नकारात्मकतेला तुझ्या वर

सोस थोडं तू कळ

देव नक्कीच देईल लढण्यास बळ

पण काढू नको असं अचानक पळ

नाही कोणतं संकट महाकठीण

कर थोडं तू सहन

नको करु कधीही नकारात्मक गोष्टींचं वहन

नाही तर त्या करतील तुजला दहन

नको होऊस इतका जीवावर उदार

नकोस बिघडू देऊ आपली लहर

नकोस करू तू असा कहर

कर प्रत्येक परिस्थितीशी तू सामना

झेलूनी अंगावर यातना

आनंदी आहे हे आयुष्य

नक्कीच लाभेल कधीतरी यश

पण पचव सध्याचे हे अपयश

नाही जगणे अवघड

कर त्याला सवगड

नाही करणार जग तुझी पर्वा

कारण तुच आहेस तुझा सर्वेसर्वा

कर थोडं आई-वडीलांची चिंता

नको लावू पेटवायला तुझीच त्यांच्या हातून चिता



कवी- विश्वेश्वर कबाडे उर्फ शुभसंतती, अणदूर,ता.तुळजापूर

भ्रमणध्वनी- ९३२६८०७४८०


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू