पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

वरिष्ठ-कनिष्ठ

आहेस वरिष्ठ

म्हणूनी का छळावे कनिष्ठ

कुठं गेले तुझे संस्कार

का पैदा झाले असे विकार?

का कान ठेवतोस हालके?

त्यामुळेच चमचे होतात बोलके

खोल मनातूनी कर थोडा विचार

नको होऊस चमच्यापुढे लाचार

संभाळतो फक्त चमच्यांची मर्जी

खाऊन त्यांची अंडा-बुर्जी

एखाद्याला किती छळायचं

एखाद्याला किती यातना द्यायच्या

याचं ही ठेव थोडं मापदंड

नाही तर परमात्मा नक्कीच देईल तुजला दंड

भेटली तुजला वरिष्ठ खुर्ची

मग का लागते कनिष्ठांची मिरची

नको होऊस उगाच बेभान

चमच्यांना देऊ नकोस मान

आम्हा कनिष्ठांच्या आयुष्यात आणू नकोस ताण

समजूनी घे गोष्टी लहान-सहान

प्रत्येक गोष्टींना असतात मर्यादा

म्हणूनी चमच्यांचं ऐकू नको सदा

करतो आमची पगार Hold

कारण आम्ही होत नाही Mold

आम्हीही देऊन परीक्षा

घेतलोय नोकरीची दिक्षा

नकोस करू तुझ्या खुर्चीचा इतका गर्व

एक दिवस आमचाही येईल पर्व

विवेकाने कर तू प्रत्येक कामाचं मूल्यमापन

नको करू उगाच पूर्वग्रह दूषित गोष्टींचं वहन

समजूनी घे जीवनाचा सार

नको छळू फार

नाही मनुष्य जन्म बार-बार

चमचे असतील तुज खास

तुझाही असेल त्यांच्यावर विश्वास

पण प्रत्यक्षात पहा परिस्थिती

मग लक्षात येईल आमच्या कामाची परिमिती

नको बाळगू विकृती

घे समजूनी आमचीही आकृती

मग बिघडणार नाही तुझी प्रकृती

विसरणार नाही संस्कृती

नकोस आणू आत्महत्येची वेळ

मग अवघड होईल तुज पुढील काळ

प्रत्येकालाच भोगावे लागतात कर्म

समजूनी घे आताच मर्म



कवी- विश्वेश्वर कबाडे उर्फ शुभसंतती, अणदूर

ता.तुळजापूर

भ्रमणध्वनी- ९३२६८०७४८०


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू