पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

टाळेबंदी

आपल्या राज्यात सध्या आहे टाळेबंदी

बाहेर आहे कोरोनाच्या संसर्गाची संधी

आता आल्याय आर्थिक मंदी

कोरोनाने माजवला हाहाकार

माणसं झाली आता बेकार

कोरोना मारतोय एकावर एक षटकार

शास्त्रज्ञांनाही कळत नाही त्याच्या उपायाचा सार

वाढलाय प्रत्येकाच्या ताणाचा भार

पण कोरोनाचा चालूच आहे मार

संसर्गजन्य माणसांची संख्या चालली आवाक्याबाहेर

चालू आहे जोरात या विषाणूचा वार

म्हणून टाळेबंदी पाळा कडक

नाही तर वातावरण होईल भडक

टाळेबंदीत राहून मोडा कोरोनाचे शृंखला संक्रमण

नका करू विनाकारण बाहेर भ्रमण

नियंत्रित करा आपले मन

शाबूत ठेवा आपले तन

तेंव्हाच लागेल आपले ध्यान

नका करू बाहेर फिरण्याची घाई

नाही तर ती संकटात नेई

समजूनी घ्या आलाय कठीण प्रसंग

नका करू टाळेबंदीचा भंग

गात रहा घरी फक्त देवाचे अभंग

खात रहा करुनी खमंग

पण ठेवा उमंग

टाळेबंदी हाच आहे कोरोनावरती उपाय

नाही तर त्याचा असाच चालू राहील अपाय



कवी- विश्वेश्वर कबाडे उर्फ शुभसंतती, अणदूर,ता.तुळजापूर

भ्रमणध्वनी- ९३२६८०७४८०

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू