पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मंगलमूर्ती गणराजा

*॥मंगलमुर्ती गणराजा॥*

_____________________

मंगलमुर्ती गणराया , गणराजा , गिरिजासुता
अधिर होऊनी जमले सारे , तुझ्याच रे स्वागता ॥

गजराजा, गजाधिशा, गजाधरा , गजानना
मिळुनि सारे सजवितो मखरा , करण्या तुझी
प्राणप्रतिष्ठापना ॥

गजदंता, गजवरा, गुणेश्वरा , गणनाथा
केवडा , सुगंधी चाफा , सहस्त्र दुर्वाकुर वाहिले
चरणी तुझ्या ॥

धुम्रवर्णा, भालचंद्रा, वक्रतुंडा , कृष्णपिंगाक्षा
अबिर , गुलाल,शेंदुर, कस्तुरी , फुले जास्वंदि
वाहिली मस्तकी तुझ्या ॥

एकदंता , विनायका , गणनायका , लंबोदरा
नैवेद्य मोदकांचा भावतो तुला
खरा॥

गायका , गायकवरा, गायकाभयदायका
टाळ झांजा वाजवुनी धरला तुझ्या आरतीचा ठेका ॥
गितप्रसन्ना, गितस्पृहा, गंधकाय, गंधर्वकुलदेवता
वाजवुनी टाळ्या दंग आम्ही आरती तुझी गाता ॥

बघ होते मग गैोराई उत्सवी सामिल
नाच- जागरण करता येई आनंदा उधाण ॥

बघता बघता येतो मग , दिवस
विसर्जनाचा
" पुढच्या वर्षी या लवकर "
सांगुन निरोप घेण्याचा ॥

......... प्रदिप राजे
रोहा _ रायगड
२२/८/२०२०
( स्व)

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू