पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सावल्या

सावल्या    

 

सावल्याच पाहतो मी

सोसलेल्या वेदनांच्या,

गर्दीतही राहतो मी

या रिकाम्या चेहऱ्यांच्या,

 

कोणता किनारा आता

दूर ही दिसत नाही,

अथांग सागर आता

खोल का भासत नाही,

 

दुख वेदनेचा रोज

बोलबाला फार होतो,

रात्र अवसेची आज

चंद्र उरात विझतो,

 

सगळी स्वप्ने इथली

मी मागून घेतलेली,

माझीच आसवे खारी

मी जागून वेचलेली,

 

किती चंद्र पेटवूनी

इथे रोज विझवले,

अनेकदा जागूनी मी

निद्रेस या विनवले !!!

 

महेश कुलकर्णी ( मदमस्त )

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू