पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

खंत

खंत 

तिच्या कडची बातमी मला कळली आणि मी लगेच तिच्या कडे पोचले , दार उघडेच होते, ती एकटी घरांत, मला बघताच ती धावून आली, गळ्यांत पडली, धाय मोकलून कडून लागली, काय समजावून हिला? शब्द फुटत नव्हता, मी तिच्या पाठीवरून हात फिरवत होते, दोघी स्तब्ध, ती स्वत:ला सावरायला प्रयत्न करत होती पण शक्य होत नव्हतं थोडा वेळ गेला मी हळूच तिला खुर्चीत बसवलं, हळू- हळू संवाद सुरुंग झाला दोन दिवसातच या भयंकर आजाराने तो गेला , ती काहीच करुं शकली नाही, मुलं बाहेर कोणी जवळ नाही म्रतदेह पण घरी येणार नाही, मी चहा करुन पाजला डबे धुंडाळुन दोन बीस्कीट़ं खायला दिली।
मी भानावर आले, मी तर माझ्याच घरी आहे, हा तर मनाचा खेळ होता मी मनानं तिच्या घरी गेले होते, कितीही वाटलं तरी शरीरानं जाणं शक्य नाही, काय विचित्र परिस्थिती झाली आहे, आज आपण कोणालाच ़एवढी सुद्धा मदत करुं शकत नाही जीव तुटतो आहे तळमळ तो आहे, धावून दुसऱ्यान्च्या मदतीला जाण्यासाठी पण माणूस हतबल आहे।
कधीतरी लिहलेल्या या चार ओळी निरर्थक वाटताहेत कारण मीच काय सर्वच हतबल आहेत।


संकटआले अनेक वेळा
हतबल पण मी कधी न झाले
त्याच्या विश्वासावर महापुरातूंन
पैलतीराला पाय लागले।


त्याच्या वरचा विश्वास अजिबात कमी झाला नाही पण हतबलतेची खंत मात्र मनांत घर करून आहे ।


माधवी करमळकर

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू