पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

वर्गमित्र

बसावसं वाटतं परत शाळेत जाऊन

 मस्ती करावीशी वाटते मन भरून

 ज्यांच्याशी कधी चुकून भांडलो होतो

 त्यांची माफी मागायची मनापासून 


 कोणाच्या जपलेल्या पेन्सिली आठवतात अजून

 कोणाच्या डब्याची चवही

शिक्षकांचा खाल्लेला मार पाठवतो

 तसेच त्यांनी केलेलं कौतुकही


 मित्रांनी केलेल्या टिंगली आठवतात

 आणि कुणीतरी घेतलेली काळजीही

शुद्धलेखन, पाढे अजून घाबरवतात 

आठवतात प्रेमानं जवळ घेणारे शिक्षकही 



दिस मास सरली वर्षे 

काहीतरी हरवले होते 

परत मी आनंदी झालो 

वर्गमित्र  गवसले होते 

-वसंत सरमळकर








पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू