पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अभंग

"काय बाबा, सकाळी सकाळी रेडिओवर भक्तीगीते लावता मोठ्याने.जरा झोपू द्या ना!लॉकडाऊन आहे.काय करायचयं उठून?" अजय कानावर उशी दाबत म्हणाला.

"अरे,ते भक्तीगीत नव्हे अभंग आहेत ते.आजूबाजूला सगळीकडे इतकी भयावह परिस्थिती आहे.रोजच्या मिळणाऱ्या बातम्या आमच्या अस्वस्थतेमध्ये भरच घालतात.कितीही काळजी घेतली तरी आपल्याला तर कोरोना होणार नाही ना अशी सारखी भीती वाटते.पुढे काय होणार ह्या विचाराने रात्ररात्र झोप लागत नाही.शारिरीक स्वास्थ्य जपण्यासोबतच गरज आहे मानसिक आरोग्य जपण्याची,जेणेकरून कोरोनाशी लढतांना कुठल्याही क्षणी आपण हार मानणार नाही.मनाचा कणखरपणा असाच अभंग राहण्यासाठी दिवसाची सुरवात प्रसन्न अभंगाने करतोय,ज्यामुळे माझं मन शांत राहील आणि मी खंबीरपणे परिस्थीती हाताळेन." बाबा उत्तरले.

अजयला बाबांचा हा प्रामाणिक प्रयत्न एकदम पटला.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू