पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

व्हाट्स ऑन योर माइंड??

*what's on your mind??? *
 काय आहे आज माझ्या मनात?? 
आज...? आज सर्वत्र शांतता... सर्व रंगाना एकत्र करून जो रंग तयार होतो तोच रंग आज माझ्या मनाचा.. पांढरा... प्रकाश... तेज... 
तसंच काहीतरी... आपल्या रोजच्या भेटणाऱ्यांना गमावण्याचे दु:ख.. आप्तजनांच्या सुरक्षिततेची अनामिक भीती,काळजी..ह्या परिस्थितीतही लोकांचे कुत्सित विचार ऐकल्यानंतर उफाळून येणारा राग. .. आजही पैश्याच्या मागे धावणाऱ्यांची किळस,. 
 जे लढा जिंकून आले त्यांच्या आनंदात सामावलेला माझा आनंद, उत्साह... 
जीवनात कसलीही गोष्ट स्थिर नाही... अक्षुण्ण नाही... सुखा नंतर दु:ख .. दु:खानंतर येणारे सुख.... एक अनंत चक्र... ह्या चक्रात अड़कलेला माणूस..... 
हे सर्व विचार करून आलेले स्मशान वैराग्य.... क्षणिक पण सत्य.... 
सर्वत्र नीरव शांतता... 
झाडावर उमललेलं एक लहानसं फूल... चिवचिवाट करणारी एक छोटीशी चिमणी... कुठलीच काळजी न करणारी... आजच्या पुरतं जगणारी... जगाला आनंद देणारी.. उमेद देणारी.... 
आज माझं मन शांत आहे... संथ नदीसारखे वाहणारे.... 
कुठलीही इच्छा नाही.... 
बस खिडकीतून बाहेर त्या फुलांना, घरी परतणाऱ्या चिमण्यांना बघून सुखावणारं. 
सूर्यास्ताच्या लालसर रंगात न्हाऊन अंधाराची वाट बघणारं.... 
कारण ह्या मनाला ठाऊक आहे की अंधारानंतर उजेड आहे....!!! 
आणि रात्री नंतर सकाळ आहे....!! 

©ऋचा दीपक कर्प

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू