पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मित्रास पत्र

*पुस्तक दिनानिमित्ताने*


*मित्रास पत्र*


प्रिय------------------

मित्रा, दोस्ता, फ्रेंड्या

माफ कर मला

काल तुझा जन्मदिवस

काल सकाळपासूनच तू माझ्याकडे आशेने पहात होतास

पण काल देखील मी तूला साधा शेकहँड देखील केला नाही. 


खरच इतका कसा बदललो मी

काहीच कळत नाही

खर तर लहानपणा पासूनचा माझा प्रत्येक क्षण तूझ्या सहवासातला

तूच तर होतास माझा प्राणप्रिय सखा सोबती 

लहानपणी इसाप, लाकूडतोड्या, जादूगाराच्या गोष्टीतून 

शाळेत मराठी, इंग्रजी, हिंदी, इतिहासातून

वाचनालयात, 

स्टॅॅडवरील पेपर स्टॉलवर, 

सगळीकड आपली *दोस्ती* बहरत गेली. 


महाविद्यालयातील फुलपाखरी जीवनात 

तूच तर होतास प्रितीचा एकमेव साक्षीदार 

पोटातल्या चिठ्ठ्या 

मजकुर ओठांवर न आणता तिला अलगद पोहोचवणारा विश्वासू प्रेमदूत. 


आतादेखील माझं तुझ्यावर तेवढच प्रेम आहे रे म्हणून तर पगाराच्या दिवशी 

बाजारातून तुला आणि तुझ्या कुटूंबातील अनेकांना न चुकता घरी घेऊन येतो. 


मी आॅफीसमधून आल्यावर 

तू आशाळभूतपणे मी तूला जवळ घेण्याची वाट पहात असतोस 

पण - - - - - - - - - - 

ये दुनिया है मायाजाल मित्रा 

तुझ्या त्या स्मार्ट, चुणचुणीत, माॅर्डन फ्रेंड्स 

व्हाॅटसअॅप, फेसबुक, ट्विटर इ. इ. 

मला त्यांच्याकडे कधी आकर्षित करतात 

आणि मी त्यांच्यात कसा गुंतून जातो 

तेच कळत नाही 

आणि 

माझ्या आयुष्यातील अजून एक दिवस 

लाईक्स आणि काॅमेंटस मध्ये 

*पुस्तक वाचल्याशिवायच निघून जातो* 

फक्त 

मित्र घरी आल्यावर दाखवायला *अजून न उघडलेल्या पुस्तकांची लायब्ररी* मात्र शिल्लक रहाते. 

   

  ( म्हटल तर गद्य, म्हटल तर पद्य) 

     (  छंद : अस्वस्थ )

    ©. नितीन मनोहर प्रधान

         रोहा रायगड

         24 एप्रिल 2021

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू