पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

स्वप्नपूर्ती

*स्वप्नपूर्ती*

सुमीत लहानपणापासूनच खुप हुशार 

त्याच्या आईला वाटत होते त्याने विराट कोहली सारखे क्रिकेटवीर व्हावे.

पण त्याच्या वडिलांना वाटत होते. त्याच्यामधे सुप्त अभिनय दडलेला आहे. त्याने अमिताभ बच्चनपेक्षाही श्रेष्ठ चित्रपट अभिनेता व्हावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती. 

त्याच्या मोठ्या बहिणीला त्याच्या मध्ये अभिजात संगीत दिसत होते. तिने त्याच्या वयाच्या पाचव्या वर्षापासूनच त्याच्यासाठी संगीताचा क्लास लावला होता. 

त्याच्या मोठ्या भावाला मात्र वाटत होते त्याने डॉक्टरच बनले पाहिजे. म्हणुन लहानपणापासुनच त्याने त्याला अभ्यासाच्या घाण्याला जुंपले होते. 

प्रख्यात धर्मगुरू असलेल्या त्याच्या आजोबांना मात्र त्याच्यात भविष्यातील धर्मगुरू लपला असल्याचा साक्षात्कार झाला होता त्यामुळे ते त्याला रोज पहाटे चार वाजता उठवून धर्म शास्त्राचे शिक्षण देत होते. 

एक दिवस सकाळी चार ते रात्री अकरा अशा घाण्यातून पिचून निघाल्यानंतर मध्यरात्री तो जोरजोरात हसायला लागला आणि अचानक रडायला लागला. 

जवळ जवळ दोन महीने असेच गेल्यानंतर त्या भविष्यातील सन्माननीय क्रिकेटर, चतुरस्र अभिनेता, कुशल संगितकार, तज्ञ डॉक्टर, ज्ञानी धर्मगुरू वगैरे बनु शकणाऱ्या बहुआयामी व्यक्तीमत्वाच्या सुमीतला *वेड्यांच्या हाॅस्पिटल मध्ये* दाखल करण्यात आले. 

त्याच्या पालकांच्या स्वप्नांचा पार चक्काचूर झाला होता. 

 सध्या तो शहाण्यांच्या जगापासून खुप दूर  वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये खऱ्याखुऱ्या कॅनव्हासवर खरी खुरी चित्र रंगवत आपल्या चित्रकार बनण्याच्या स्वप्नपूर्तीच्या आनंदात शांतपणे रहातो आहे. 

             ©  नितीन मनोहर प्रधान 

                   रोहा रायगड 

                   9850424531

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू