पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मृत्यूचे तांडव

मृत्युचे तांडव 

करू नका विचार उद्याचा
आज जगा, वर्तमानात
अखेरच्या क्षणाला, बंधु
धन, दौलत नाही येत कामात!!१!!

राग, द्वेष, मत्सर नको
शिंपडा प्रेमाचे चांदणे
काळ रात्र आहे पाठीशी
नको या समयाला सांगणे!!२!!

अंतसमयी नसे आप्तेष्ट
लाडकी लेक, पुत्र वा दारा
ना गंगाजल, तुळशीचे पान
संपतो खेळ जीवनाचा सारा!!३!!

माझं,माझं म्हणत जमवली
ही नश्वर माया, या जीवनी
नाही मिळत श्वास, पैश्याने
कळते अगदी शेवटच्या क्षणी!!४!!

सोन्यासारखा मायावी संसार
होत्याचा नव्हता रे झाला
भविष्याचा विचार करत
जवळचा,माणुस पहा दुरावला!!५!!

सौ. कल्पना देशमुख

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू