पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

रामभक्त हनुमान

स्पर्धेसाठी

       *कथालेखन*


 *विषय :- नवी उमेद*


     संदीप मध्यमवर्गीय कुटुंबातील शांत, हुशार व समंजस मुलगा. त्याचे वडिल प्राथमिक शिक्षक व आई अंगणवाडी सेविका. सोनल व तन्वी या दोन छोटया बहिणी.

संदीप M.S.C.Math च्या शेवटच्या वर्षाला, सोनल इंजिनीअरच्या पहिल्या वर्षाला व तन्वी बारावी विज्ञान शाखेला होती. तिघेही भावंडे उपजतच हुशार होती.

-------------हे पंचकोनी कुटुंब अगदी आनंदात होते.  वडिल शिक्षक असल्यामुळे घरात सुसंस्कृत व शिस्तबद्ध वातावरणा चे तिघा भावंडावर सुरेख संस्कार झाले होते. पण नियतीला या कुटुंबाचे सुख पाहवले नाही. एक दिवस संदीप कॉलेज मधुन परत येत असतांना त्याला दत्त चौकात गर्दी दिसली. कुणीतरी बोलत होते, "साने गुरुजी शाळेतले जोशी  सर आहेत ". संदीप ने सायकल बाजुला ठेवली व गर्दी बाजुला करत तो पुढे गेला व "बाबा, काय झाले ? असे म्हणुन रडायला लागला. सेवाधारी व्यक्तीच्या सहकार्याने जवळच असलेल्या दवाखान्यात ऍडमिट केले. परंतु मेंदूला जबर जखम झाल्याने उपचार सुरु असतांनाच प्राणज्योत मालवली.

------------आनंदात रममाण असणारे, हसरं वातावरण असलेले हे कुटुंब शोकसागरात बुडून गेले. संदीप ने आईला दुःखातून  सावरत धीर देत म्हणाला,"अगं आई रडू नकोस. सावर तु स्वतःला, आम्हाला तुझ्याशिवाय कोण आहे ग ?"

तो आपल्या बहिणींना जवळ घेत म्हणाला, " मी आहे ना ! मी तुम्हाला सांभाळील व स्वतःचे अश्रू पुसले "

 ----------दिवसामागून दिवस गेले. सर्वं परिवार दुःखातून सावरला. तिघेही भावंडे छान पास झालीत.

संदीप एका शिकवणी वर्गात गणित हा विषय शिकवायला जाऊ लागला. वडिलांची पेन्शन, आईचा थोडाफार पगार व शिकवणी वर्गाचे मिळणारे पैसे या  मधे बहिणींचे शिक्षण आटोपले. सोनलला बी. ई. झाल्यानंतर पुण्याला पाठवले. तन्वी बी. फॉर्म. चा अभ्यास करत होती.

-------------गाडी बऱ्यापैकी रुळावर आली होती. वडिलांची उणीव जाणवत होती. आठवणी मनात रुंजी घालायच्या, आई व बहिणीच्या डोळ्यात आसवे तरळत होती. भावनांना वाट मोकळे करणेही गरजेचे होते. सोनल ला नोकरी लागली. तन्वी बी. फॉर्म. च्या वर्षाला होती. कॉलेज मधुन फर्स्ट होती.

--------------संदीपला एका नामांकित शाळेत गणित शिक्षक म्हणुन चांगली नोकरी लागली. अल्पावधितच संदीपचा  नावलौकिक  उत्कृष्ट गणित शिक्षक म्हणुन शहरात झाला.

----------सोनल व तन्वीचे लग्न चांगले स्थळ आले आणि साध्या पद्धतीने उरकून संदीप जबाबदारीतून मोकळा झाला. संदीप वर जळणाऱ्या शाळेतील शिक्षकांनी त्याला खोट्या तक्रारीत अडकवले व त्याला सस्पेंड करण्यात आले. वडिलांच्या पश्चात कुटुंबाला आधार देणारा संदीप पार कोलमडून गेला. मानसिक धक्का त्याला बसला.जेवण सुद्धा वेळेवर घेत नसे. आईला फार काळजी वाटायची. तिने खुप समजावले, " बेटा, निराश होऊ नको. आपल्याला आर्थिक अडचण नाही. निश्चिन्त रहा. तुला लागलेला हा कलंक आहे. अरे, सगळं व्यवस्थित होईल. नोकरी परत मिळेल. आपण कोर्टात केस टाकू. "आईच्या बोलण्याने संदीप ला धीर आला. दोघी बहिणी, जावाई यांनी पण त्याचे मनोधैर्य वाढवले.

----------संदीप ने मनाची तयारी केली. घरीच गणिताचा शिकवणी वर्ग सुरु केला. विद्यार्थी वर्ग त्याच्या मागे लागून होतेच शिकवणी सुरु करण्यासाठी. शुभ मुहूर्तावर क्लासेस सुरु केले. चांगला प्रतिसाद मिळाला.

त्याला जेवायलासुद्धा वेळ  मिळत नसे. आलेल्या प्रसंगाला न घाबरता नव्या उमेदीने पाऊल टाकले *. *विजय कोचिंग क्लासची  प्रसिद्धी झाली. वडिलांच्या नावाने सुरु केलेल्या क्लास ने विजयश्री खेचून आणली. वडिलांचा आशीर्वाद पाठीशी होता. कॉलेजचे बी. एस. सी. चे विद्यार्थी शिकवणीला खुप असल्यामुळे दहावीचे विद्यार्थी घेणे बंद केले. फक्त बारावी व कॉलेजचेच विद्यार्थी यांची शिकवणी घेई.

---------------संदीपच्या केसचा निकाल त्याच्याच बाजूने लागला. मधल्याकाळात बी. एड. केले. सेट नेट परीक्षा दिली व त्यात यशश्रीने पुन्हा त्याच्या गळ्यात माळ घातली. एका नामांकित कॉलेजला सिनियर कॉलेज प्राध्यापक म्हणुन सेवेत रुजू झाला. शाळेतील नोकरीचा रीतसर राजीनामा दिला.

------------आईचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याला आईने कवटाळले व म्हणाली,"बाळ, आज तुझे बाबा असते तर त्यांनाही खुप आनंद झाला असता. खुप खुप मोठा हो. "

आईचे आनंदाश्रू अनावर झाले.

--------------- संदीप उत्तरोत्तर प्रगती होत होती. विदयापीठ मधे गणित विभाग प्रमुख म्हणुन नेमणूक झाली. सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत होता. विदयापीठ मधे बाबांचे विद्यार्थी होते, ते संदीपला म्हणायचे, " विजय जोशी सरांचा मुलगा का तु? आम्हाला शिकवले तुझ्या बाबांनी. "वडिलांविषयी असे गौरवोदगार ऐकले की, संदीपला आपल्या वडिलांचा खुप अभिमान वाटायचा.

दिवसामागून दिवस गेलेत. आईला paralysis चा अटॅक आला. आई पलंगावरच होती. घर, कॉलेज, सेमिनार यामुळे त्याची फार धावपळ व्हायची. आई त्याला म्हणाली,"संदीप तु छान सेटल झाला आहेस. आपण तुझ्यासाठी, बरोबरीचे शिक्षण असलेली मुलगी बघुन लग्न करुन टाकू या." बहिणी सुद्धा त्याच्या मागे लग्नाचा तगादा लावत होत्या. पण आईच्या आजारपणामुळे त्यांनी लग्नासाठी हिरवी झेंडी दिली. सुसंस्कृत व सुशिक्षित  मुलगी पाहुन त्याचे साक्षगंध आटोपले व जवळचाच विवाह मुहूर्त पाहुन अंजली व संदीपचा विवाह पार पडला.

----------लग्नानंतर आईला घरी एकटे ठेवून हनिमून ला जाणे त्याला योग्य वाटले नाही. परंतु आईच्या आग्रहाखातर दोघे काश्मीर ला गेले. आईजवळ बाबांच्या दूरच्या नात्यातली मुलगी केअर टेकर म्हणुन ठेवली.

आईची काळजी मिटली होती. संदीप ने संकटावर मात करुन आपले आयुष्य उभे केले.

जीवनात आलेली आव्हाने समर्थपणे पेलली याचा सार्थ अभिमान आईच्या चेहऱ्यावरून संदीपला जाणवत होता. त्याने आईच्या सेवेत जराही कसूर ठेवला नाही. अगदी मनोभावे सेवा करत होता.

---------त्याचे वैवाहिक जीवन अगदी छान सुरु होते. नातेवाईकांमधे, शेजारी त्याचे उदाहरण देत.

कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता नव्या उमेदीने सर्वं संकट पेलले.

सौ. कल्पना देशमुख

यवतमाळ

मोबाईल नंबर :-

8208721052

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू