पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

विज्ञापन जिंदाबाद

प्रवास प्रसंग

            "विज्ञापन जिंदाबाद"

आजचा संसारात जाहिरातीचे फॅड फारच वाढलेले आहे. रेडिओ,सिनेमा,टीव्ही,वर्तमान पत्र ,मग रेल्वे,बस, सिटीबस,सांगायचे तात्पर्य कुठले ही स्थान सुटले नाही ये,सर्व ठिकाणी जाहिरातींची भडिमार आहे.

खरं सांगायचं तर ह्या प्रवास प्रसंगाचा विषय जाहिरात नसून,जाहीराती मुळे ट्रेन चुकण्या आणि फिल्मी स्टाईल मधे परत पुढील स्टेशनवर धरण्याचा आहे. 

  प्रसंग 10 डिसेंबर 2017 चा आहे.. 

मला चुलत बहिणीचा मुलीचा लग्न प्रसंगी देवास हुन नागपूर ला जायचे होते. बरं आजकाल लोक 4 महिन्यापूर्वीच येण्याचे निमंत्रण देऊन टाकतात म्हणजे ऐनवेळेस कुठला ही बहाणा नको की "काय सांगू अगदी बॅग भरून ठेवली होती पण रिझर्वेशनच मिळाले नाही" तर मी सुद्धा नियमाप्रमाणे 90 दिवसा पूर्वीच तिकीट काढून ठेवले होते. 

 यात्रेचा दिवशी तैयारी करताना तिकीट बघितले. कोच न.,सीट क्रमांक, ट्रेन निघण्याची वेळ सर्व कन्फर्म केले. तिकिटावर लिहिले होते -

schedule date and time -10.12#########(9.10)

चित्रवलेल्या ठिकाणी एक विज्ञापन होते आणि त्यावर 9.10 वेळ प्रिंट होता. 

 आता संयोग असा की देवास हुन नागपूर साठी दोन ट्रेन्स आहे एक 9.10 वाजता जाते आणि एक 10 .15 ला. मला वाटले की आज आपली ट्रेन 10.12 ची आहे.. 

मी आपल्या सवयी प्रमाणे 1 तास अगोदर घरून निघालो..मित्र घरी आला होता,त्याचे घर स्टेशन वरून 5 मिनिटांचा रस्त्यावर होते, विचार केला तासभर मित्राकडे गप्पा करू आणि मग पुढे......

10 वाजता मित्राने स्टेशनवर सोडले व तो निघून गेला. स्टेशन वर पाहिजे तशी गर्दी दिसली नाही,उलट शुकशुकाट वाटले,थोडी शंका वाटली. स्टेशन मास्तरांचा कार्यालयात जाऊन विचारपूस केली तर त्यांनी सांगितले कि नागपूर ट्रेन तर 9.15 ला गेली. मी त्यांना तिकीट दाखवले,त्यात 10:12 स्पष्ट आणि जाहिराती मागे अस्पष्ट 9:10 असे लिहिले होते.. बरं 10:12 म्हणजे आज 10 डिसेंबर आहे असे त्यांनी माझा ध्यानांत आणून दिले. 

माझे तर हातपाय थंड झाले. काय करावे सुचेना. इतक्यात त्याच ट्रेन मधून प्रवास करण्याऱ्या चुलत भावाने फोन केला की "दीपक ,तू कुठल्या कोच मधे आहे?"

तो इंदूर हुन ट्रेन मधे बसला होता. मी त्याला सांगितले की माझी ट्रेन चुकली आहे. त्यानी लगेच सुचवले कि बस/टॅक्सी करून भोपाळला येऊन ही ट्रेन धर. तेथील वेळ रात्री 1.30 आहे. मी टीसी ला सांगतो की ह्या सीट वर माझा भाऊ भोपाळ हुन बसणार आहे. 

  मी लगेच मित्राला परत बोलवले. बस स्थानकांवर टॅक्सी /बस काहीच मिळाली नाही. त्याला भोपाळ बायपास वर चलण्यासाठी म्हटले तेथून इंदोर भोपाळ चारटर्ड बस मिळण्याची शक्यता होती. 

तेथे गेलो,लगेच एक चार्टर्ड बस आली सुद्धा पण......बिना रिझर्वेशन बसवण्या साठी तयार नव्हता. त्याला माझी परिस्थिती सांगितली पण काहीच उपयोग झाला नाही.. 

 शेवटी 11 वाजता इंदोर जबलपूर निजी बस आली. त्यात बसलो देवाचे नाव घेऊन...(ते भजन आहे न ..दुःख मे सुमिरण सब करे सुख मे करे न कोई) वेळेवर भोपाळला पोहोचण्याची शक्यता शून्य वाटायला लागली.. 

20 मिनिटांनी बस एक ढाब्यावर थांबली,लगेच क्लिनरने  सूचना दिली की येथे बस जेवण्यासाठी 30 मिनिटं थांबेल! 

आता तर माझी निराशाच झाली. बस परत सुरू होई पर्यंत धाकट्या भावाला फोन केला. तो झांशी हुन नागपूरला केरळ एक्सप्रेस नी जाणार होता. त्या ट्रेन ची वेळ रात्री 3.00 वाजता आहे. मी त्याला सर्व माहिती दिली आणि सांगितले की "भोपाळ हुन तुमच्या कोच मधे मी पण येईन" बघू कसे काय जमतंय. 

  तेवढ्यात बस रवाना झाली आणि माला थोडी डुलकी लागली. बस थांबली आणि माझी झोप उघडली. वाटलं की परत कुठे तरी अधे मधे बस थांबली की काय? 

खिडकीतून डोकावून बघितले तर भोपाळ स्टँडवर बस उभी होती!! घड्याळ बघितले तर 1 वाजायला ही 2-3 मिनिटं बाकी.. 

मी लगेच रिक्शा केला आणि भोपाळ स्टेशन गाठले. "चुलत भावाला ही सूचना केली की मी भोपाळला येऊन गेलो आहे'

त्यांनी लगेच कळवले कि ही ट्रेन भोपाळला थांबत नसून हबीबगंजला स्टॉप आहे. तात्पर्य अजून परीक्षा बाकी होती. मी लगेच भोपाळ ते हबीबगंज तिकीट काढले. Enquiry वर कळले की हबीबगंज साठी ट्रेन 2.00 वाजता आहे. 

लगेच स्टेशनचा बाहेर आलो।रिक्षा वाल्याला विचारले की "हबीबगंज चलना है।" तो म्हणाला बैठो "200/- लुंगा"

फक्त 20 मिनिट बाकी होते. मी लगेच त्याला सांगितले की "इंदोर नागपूर ट्रेन पकडना है" 

"ठीक है" तो म्हणाला. 

मी परत देवाला नमस्कार केला आणि बसलो. सहसा मी रात्री रिक्षा प्रवास टाळतो ,पण "अडला नारायण गाढवाचे पाय धरी".

रिक्षेवाल्यानी विचारले की "तिकीट है की निकालना है" 

मी उत्तरलो "मेरा तिकीट है"

1.28 ला रिक्षा हबीबगंज स्टेशनवर आली,त्यांनी बरोबर ओव्हरब्रिजचा खाली उभी केली ,त्याला 200/-दिले ,त्यानी अनपेक्षित 50/- परत केले आणि बोलला की "जल्दी जाओ ,ट्रेन आ रही है."

 मी धावत पळत ब्रिज वर चढलो. 

तितक्यात अनाऊन्समेंट ऐकू आले की-

" इंदोर से नागपूर जाने वाली ट्रेन प्लॅटफॉर्म न.6 पर आ रही है"

 माझा समोरच ट्रेन आली,माझा कोच पण समोरच दिसला, त्यात माझा चुलत भाऊ भोपाळ हुन येवून बसलेला होता. 

 पाच मिनिटांत ट्रेन नागपूर कडे रवाना झाली. भावाला धन्यवाद देऊन त्याचा जागी आराम करण्या साठी पाठवले. 

व मी एक दिर्घश्वास सोडून आपल्या सीटवर पसारलो. 

 तितक्यात टीसी आला"

देवास वाले आ गये क्या"

मी त्याला होकार दिला आणि नागपूर पर्यंत निद्रस्थ झालो.. 

दीपक कर्पे

देवास

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू