पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

ग आणि रे

संगीताच्या सुरांसारखे 

संसारातले 'ग' आणि 'रे'

जीवन रुपी गाडीच्या

या चाकांवर आनंद फिरे


'ग' असते 'रे' च्या सतत पुढे

'रे' नेहमीच 'ग' च्या पाठीशी

'रे' तीव्र असे अन् कोमल 'ग'

चाले गाडी आयुष्याची


'सा' 'रे' असती 'ग' च्या मागे

'ग' विन 'सा' 'रे' असती अपुरे

'सा' 'म' वेद ओवती भोवती

गंगेत स्वरांच्या 'ग' अन् 'रे'.


'रे' चा स्वर चढला की लगेच

'ग' घेते सांभाळून ताल

'ग' च्या सुरात 'रे' मिसळून स्वर

जीवन गाणे गातो रसाळ


'रे' काळा कृष्णासारखा

'ग' आहे राधेसम गोरी

माझ्या वेड्या कवी मनातली

ही कल्पनाच सारी कोरी....


-ऋचा दीपक कर्पे


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू