पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अन् तुझा चेहरा

अन् तुझा चेहरा..


रस्ते एकटे

त्यात लांबचा प्रवास व्हावा।

मनास वाटावे

कुणाचा तरी सहवास हवा

अन् तुझा चेहरा नजरेसमोर यावा।


प्रवास 

जणू वाळवंट भासावा

रणरणत्या उन्हात

कुठे सावलीचा मागमूस नसावा।

मनाने हिरवळीचा शोध घ्यावा

अन् तुझा चेहरा नजरेसमोर यावा।


मार्गात 

काळ्याकुट्ट ढगांचा थवा

नकळत नेत्री

पाऊस दाटून यावा।

उधाणलेल्या मनाने

किनारा गाठू पहावा

अन् तुझा चेहरा नजरेस यावा।

--सुनील पवार..✍️

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू