परशुरामाची आरती
|| जय श्रीराम ||
आरती परशुरामाची
जय देव जय देव जय परशुरामा,हो जय भार्गव रामा,
निशीदिन प्राणअर्पूनी मन निर्भय हे कामा||धृ||
अगम्य शक्ती लाभे,परशुरामासी
दशदिशा उजळल्या मातापुरासी
माता रेणुका ही,झाली हो जननी
हर्षोल्लासाने ती फुलली अवनी
लाभली साऱ्यांना सुखशांती अभिरामा
||१||
जय देव जय देव जय परशुरामा, हो जय भार्गव रामा ||धृ||
ह्रदयी शोभतसे,रूद्राक्ष माळा
खडग् धनुष्यही,पेलले लीलया
तेजःपुंज मुख ,शक्ती सामर्थ्याची
करूया हो आरती परशुरामाची
अनुदिनी सुखी ठेव करितसे याचना ||२||
जय देव जय देव जय परशुरामा, हो जय भार्गव रामा ||धृ||
शरण आम्ही सदा,तुझ्या चरणासी
साष्टांग नमन देवा,तव सामर्थ्यासी
विश्वामित्रही तुजला,नमस्कार करती
जगदोद्धार करण्याला, प्रभू अवतार घेती
तूच सांभाळ संकटी जगताच्या बलधामा ||३||
जय देव जय देव जय परशुरामा, हो जय भार्गव रामा ||धृ||
दानवांचे त्राही पलायन करवीसी
संकटी भक्तांचे जीवन रक्षिसी
तुझ्या नामाचा करे जयजयकार किती
पंचप्राणाने तुजला, प्रज्ञा आरती गाती
जन्मोजन्मी जपू परशुराम नामा ||४||
जय देव जय देव परशुरामा हो, जय भार्गव रामा
निशिदिन तव प्राणा अर्पुनी, मन निर्भय हे कामा ||धृ||
सौ.प्रज्ञा राजेंद्र कुलकर्णी { राज्ञी }
वसमत जि. हिंगोली
मो -९६५७९४८३९४