पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

चैत्रगौरी

चैत्रगौरी 

माझ्या घरातील गौर
उद्या जाणार सासरी
गप्पा टप्पा नी गोष्टींची
रिती होणार ओसरी

आली होती माहेराला
झुल्यावर ती खेळली
सखीसंगे गं निवांत
शेत शिवारी फिरली

आले लाडके जावई
तिला मेण्यात नेण्याला
थांब म्हणावे वाटते
माझ्या लाडक्या राणीला

न्हाऊ घालून गौरीची
ओटी भरू तांदळाची
झोळी कुळाची भरली
सदा अक्षय सुखाची

डाळ कैरी पन्हें केले
माळ कुंतली गजरा
मोगऱ्याच्या सुगंधात
तुझा भाळला नवरा

सजवून चैत्रांगण
चैतन्याची रंगावली
मोद भरता घरात
ठाईठाई आनंदली

मुरडून पहा तरी
करंजीच्या पारीतून
मूळ धाडीन भावाला
फराळाचे गं देऊन

पुन्हा ये गं लाडुबाई
तुझ्या हक्काच्या माहेरी
दान सौभाग्याचे देण्या
तुला बसवू मखरी

 

सौ.प्रज्ञा कुलकर्णी (राज्ञी)

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू