पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

हिरवे अलंकार

शब्द©सौ. पूनम राजेंद्र.

 

पानांच्या कुशीमधे, नाजूकसा मोहोर

वसुंधरेच्या खुषीचा, गंधाळता बहर

बहरत्या खुषीचा गंध हसरा सभोवार

गंधाळलेले अंगण आणि परसदार

 

अंगणी हासताहे साजिरा मुरलीधर

मुकुटावर शोभताहे मोरपीस डौलदार 

सोनचाफी सुवासाने दरवळे केशसंभार

कानात मालतीचे गुच्छ झुबकेदार

 

कमळ, गुलाब पुष्पाचे भरगच्च हार

पायामधे प्राजक्ती पैंजणी झंकार

बांबूच्या वेणूवरती शुभ्र मोगरी हार

हिरवाईचा घुमे मंजुळ गंधाळता स्वर

 

वसुंधरेच्या गंधाने नादावे तो ईश्वर

रूमझूमवत ठेवी तो आनंदाचे स्वर

वसुंधरेचे जपूनी हे हिरवे अलंकार

राधा होऊन झेलूया ते निळे वेणूस्वर

दि. ५-६-२०२१.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू