पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पाऊस थेंबाथेंबातून साचत जातो

पाऊस थेंबाथेंबातून साचत जातो..


पाऊस थेंबाथेंबातून साचत जातो

पागोळ्यातून मोती गळत राहतो।

किती दुःख झिरपतात मातीत

मोती त्यातूनही उगवत राहतो।


पाऊस ढगाढगांतून दाटून येतो

डोळ्यात इंद्रधनू तो फुलवत राहतो।

कधी उन्ह तर कधी सावली होतो

पाऊस हवेत नकळत विरत जातो।


पाऊस रिमझिम रिमझिम बरसतो

वाऱ्याच्या मुखातील गाणे होतो।

हिरव्या रानाला फुलांचा बहर देतो

पाऊस पाखरांच्या चोचीतील दाणे होतो।


पाऊस कोसळतो बेभान होऊन जातो

साऱ्या सृष्टीची तो गाळण उडवतो।

गळके छप्पर घरासाहित वाहून नेतो

पाऊस डोळ्यातून मग ओघळत राहतो।


पाऊस येतो अन् पाऊस निघून जातो 

तरी अंतर्बाह्य तो कोसळत राहतो।

आठवणी नित्य नव्या रुजवत राहतो

पाऊस स्वप्न उद्याची सजवत राहतो।

--सुनील पवार..✍️

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू