पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

ग्रुप

???? *ग्रुप*????

 

*जपायच नातं मैत्रीचं*

*म्हणून creat केला ग्रुप*

*सगळेच आपले म्हणून,*

*भावना जपा खूप*

 

*कोणी दिला reply म्हणून*

**हुरळून जायचं नाही*

*आणि नाही दिला reply*

*म्हणून खंत मानायची नाही*

 

*सर्वांची मत कायम,*

*एकसारखी असतील कशी*

*नकारार्थी,सकारार्थी,*

*प्रत्येकाची वेगळी राशी*

 

*राखायची असेल अबाधित,*

*एकमेकांची साथ*

*तर दयावाच लागतो*

*सर्वांना,प्रेमाचा हात*

 

*प्रत्येकाच मत,*

*वेगळं असायलाच हवं*

*तरच घडेल इथे,*

*रोज काहीतरी नवं*

 

*काय बरं होईल*

*नावडत्या jock वर हसलं तर*

*मनातल्या भावना झाकून,*

*थोडसं फसल तर*

 

*फक्त एकच करा मित्रांनो,*

*वेळ काढा थोडा*

*प्रत्येक जण असावा,*

*दुसर्या साठी वेडा*

 

*कधी गडबड,कधी बडबड,*

*कधी तरीच शांतता*

*दाखवून दया ना एकदा,*

*अंतरंगातील एकात्मता*

 

*दुरावलेल्या दोन मनात,*

*एक पूल बांधणारा*

*एखादा असतोच ना,*

*निखळणारे दुवे सांधणारा*

 

*ग्रुप असो नात्यांचा,*

*वा असो तो मित्रांचा*

*आपल्या हजेरीने बनवा,स्वप्नांमधल्या चित्रांचा*

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

        © *सौ मंजिरी भातखंडे*

                    *26/05/2020*

                  *8623063167*

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू