पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

गुणसमुच्चयता

गुणसमुच्चयता

शब्द©सौ. पूनम राजेंद्र.

सुस्पष्टता विचारातली

ओजस्वीता कथनातली

कोमलता काव्यातली

प्रगल्भता उमजण्यातली....


काटकता साहण्यातली

उदात्तता त्यागातली

पारदर्शकता आचारातली

प्रेरकता व्यक्तित्वातली....

उर्मी स्वातंत्र्यलढ्यातली

उत्कटता क्रांतीतली

समग्रता जगण्यातली

समरसता समूहातली....


योगिकता प्रायोपवेशनातली

प्रभावितता वि.दा.सावरकरांतली.

गुणसमुच्चयता आपल्यातली

राष्ट्राकार्यार्थ समर्पिली....


आदरणीय अनुकरणीय

बलस्थानं ही राष्ट्रातली

नित्य स्मरणीय राहोत

भ्रष्टता नष्ट होण्या आपल्यातली.

दि.२८-५-२०२१.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू