पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कॉफी

कॉफी☕️


देशील का तुझा थोडा वेळ

त्याने एकदा हळूच विचारल

समजल होतं तिलाही

त्याच्या मनात काय साचलं..१


भेटीला दिला होकार,म्हणून

होतं नव्हतं tention सरलं

वेळ ठरली, ठिकाण ठरलं

नुसत्या होकारानी,मन भरलं..२


काय बरं दयावं तिला??

सूचतच कसं नाही

आजपर्यंत तिची आवड

कधीच कशी कळली नाही??..३

काही विचारण्याची,वेळ होती जेव्हा

नुस्ती होती धडधड,धाडस नव्हतं तेव्हा

उपयोग तरी काय,आता विचार करून

तेव्हा नाही केलं,आता वेळ गेली सरून..४


सांगायलाच हवं मनातलं,असं फार वाटतं आता

तिच्या ही मनातलं जाणून घेवू,डोकावू जाता जाता

खूप सूखी आहे ती.......ऐकलं होतं मी

तरी उगाच मनात वाटलं,असेल काही कमी..५


उदयावर आला आता,भेटीचा दिवस

सुचेना काही धड,मनात नेहमीचीच आवस

कोणता बरं रंग तिला, आवडतो खरा

शर्ट घालू की टिशर्टच, दिसेल मला बरा..६


पोट थोडं माझं जरा,आलय.. का पूढे

आजच का बरं असं,मन माझे कुढे

उगाचच कपाळ थोडं ,मागे गेलसं वाटतं

जाऊदे,एवढया तेवढयानं थोडीच,

मनातलं प्रेम आटतं..७


हिरवा रंग बहुतेक,आवडतो तिला

कारण पिंपळपान वहीतून,आले होते मला

ठरलं आता नक्की,मनाशी आली एक हुक्की

आवडेल तिला अशी एक,भेट देवू पक्की..८


छानसं मोरपीस,ठेवलं होतं,अनेक वर्षांपासून

कधीतरी देईन तीला,वाटलं होतं मनापासून

हीच ती वेळ,आणि हाच तो क्षण

रेंगाळत राहीलं मात्र,भूतकाळात मन..९


ठरल्या ठिकाणी,आणि ठरलेल्या वेळेआधी

हिरव्या साडीत दिसत होती,मोहक आणि साधी

तसच आणि तेव्हडच,तेज होतं डोळयांत

तेच मिश्किल हास्य होतं,गालांवरच्या खळयांत..१०


मनात ठरवून होतो मी,घ्यायची एकच कॉफी दोघांत

पण क़शी बरं देणार अशी,ऑर्डर चारचौघात

चालू आहे डाएट सांगून, शक्कल मी लढवली

Hot water ची order देवून

तिने,विकेट माझी उडवली...११


गप्पांच्या ओघात,एक मात्र समजलं

तिचं आनंदी असण्याच ,कोडं मला उमगलं

आहे त्यात मानावा आनंद,करू नये कुरबूर

मग,जे नाही मिळालं त्याची,वाटत नाही हूरहूर..१२


मनावरच ओझं आता, झालं थोड कमी

भेटू या ना जमेल तेव्हा,अशी दिली तीने हमी

कळलं मग दोघांना,थोड़ा उशीरच झाला होता

नाही म्हटलं तरी उरात,कढ दाटला होता..१३


स्मरणात रहावी अशी,एक भेट घडली

ऋणानुबंधाची गाठ,थेट हृदयाला भिडली

आठवणींचा साठा करून,परतलो घरी

तिनं दिलेलं सुंदरसं मोरपीस,धरलं मी उरी...१४


               .........©सौ.मंजिरी भातखंडे

                      16/6/20


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू