पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अटळ विश्वास

"देव सतत आपल्या बरोबर असतो, आपण कोठल्याही त्रासात, संकटात असलो किं देव आपल्याला उचलून धरतो व म्हणूनच संकटात आपल्याला वाळूत फक्त देवाच्या पावलांचे दोनच ठसे दिसतात "

आजी नें सांगितलेली ही गोष्ट रेवाच्या बाळ मनावर पूर्ण पणे कोरली गेली होती.

मागल्या चार पाच दिवसा पासून तिचा लाडका डॉक्टर बाबा त्रासात होता, त्याला कोरोना झाला होता, आत्या कोणालातरी फोन वर सांगत होती पण म्हणजे नक्की कांय झाले होतें हे तिच्या बाळ मनाला समजत नव्हते.

"बाबा त्रासात "म्हणजे देव बप्पानें त्याला नक्कीच कडेवर उचलून घेतलें असणार.

आपल्या मनाची खात्री करण्या साठी ती धावतच बीच

वर आली.

समुद्र शांत होता, तुरळक माणसं बीच वर फिरत होती, तिनें देव बप्पाच्या पावलांचे ठसे पाहण्याचा निष्फळ प्रयत्न केला. येणाऱ्या लाटांमुळे बाळूचा बीच सपाट होता.

"अरेच्या,"!!....... म्हणजे देव बप्पा कडे कोणी तरी आजारी आहें तर!!

तेव्हाच बप्पाने बाबाला कडेवर उचलून त्याच्या कडे नेले

असणार.

रेवाने आपल्या मनाची समजूत घातली व परत पावली

घरी आली!!

 

डॉ विद्या वेल्हाणकर

अंधेरी, मुंबई

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू