पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

नाच रे मोर निर्लज्जपरी

नाच रे मोरा निर्लज्जापरी

वणवा पेटला जरी वनी

तुला काय देणं घेणं

फुलवून पिसारा नाच

 

नाच रे मोरा भ्रष्टाचारी वनी

पशुपक्षी, चराचरश्रुष्टि भयभीत जरी

तू घे बिनधास्त सोंग अप्पलपोटी 

तूच आता रे जिवलग सखा- सोबती 

 

नाच रे मोरा त्यांच्या छाताडावरी

आपल्याला काय त्यांचं मेले ,जगले

जाणून - बुजून ती येड्यांचीं जत्रा 

मुकी बिचारी हाका कुणीही

 

नाच रे मोरा चोरांच्या दारी

संधीसाधू भोंदू आपले सहकारी

संता  - बंता बेरकी, हरहुन्नरी 

हाऱ्या नाऱ्या जिंदाबाद बोलतील तेही

 

नाच रे मोरा गुलामांच्या धडावरी

संवेदनाहीन चालते फिरते मुडदेच ते

काय फरक पडतो कसेही नाचले तरी

जय हो अंध:भक्तोकी ,जय हो जनता की

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू