पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पावलोपावली बदलणारी......

पावलोपावली बदलणारी माणसे पाहतो मी

वेदनांच्या गावी नित्य आनंदात राहतो मी


बदलले कित्येकांनी सूर जीवनाच्या मैफलीचे

माझ्याच सुरावटीत जीवनाचे गीत गातो मी


दाविले किती जणांनी स्वप्न महालाचे तरी

घास कष्टाचा माझ्या झोपडीत खातो मी


झुंबरांच्या झगमगाटाची जरी वेगळी दुनिया

खुल्या नंभागणी चंद्र तारे मजेत पाहतो मी


रोज बरसतो त्यांच्या घरी पाऊस पैशांचा 

घामाच्या धारात मात्र रोज सुखात नाहतो मी


कोण कसे बदलले हिशोब ना ठेवला कधी

कर्माचा दस्ताऐवज मात्र रोज मनात जपतो मी


खेळणार रोज भावनांशी शेवटी माणसेच ती

माणुसकी पाळण्या मात्र रोज जगात खपतो मी


श्री. संदिप पंडित सोमेश्वर 

९६५७८२८६८७

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू