पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पंचतत्व

पंचतत्व

पृथ्वी


वावरते माझ्या

संपूर्ण शरीरात

आपल्या हिरवळी ने

आपल्या खडकाने

ती स्थिरावते

व कणाकणातून

रूळतेही तशीच

पृथ्वी जगावते प्रेम ही


आकाश


उतरून आलय

डोळ्यात

स्वप्नासारखं

नीळाभ्र 

निस्सीम 

झेप घेऊ इच्छितं मन 

त्याच आकाशात।


वायु


मन माझं

वायू

नसे क्षणिक विश्रांति

कधी अफाट वारं

कधी शांत पवन

चित्त कधी ही नसतं

ताब्यात

ऊष्णता मिळताच

पावतो प्रसार।


अग्नि


ह्या देहात

चाललाय रक्ताचा

प्रवाह,

हृदयाला गति देखील

फुफ्फुसात भरतेय वारं

अग्न्याशयात

धगधगतोय अग्नि

चालू आहे एक यंत्रणा


पाणी


होय

ते पाणीच

जे तीन तृतीयांश

आहे ह्या जगाच्या पाठीवर

समुद्ररूपात

तेच ह्या ही देहात

अन जितकं पाणी आभाळात

तितकच ह्या दोन डोळ्यात।


सुधीर देशपांडे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू