पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आषाढ मास देवपदी वास

*आषाढरस्य *

     माझा एक दिवस .

' आषाढ मास देवापदि वास'


कोकिळे चे मधुर स्वरगायन ,

मयूरा चे सुंदर पिसारा नर्तन 

वनचरी स्वप्नगत आले,परतले

आषाणी स्वप्नांत रंगवून गेले.२

रिमझिमत्या पाऊसांत चिम्ब

रवि किरणांचे रुते प्रतिबिम्ब ३

आषाढ आला फुलवून गेला

तृषा तृप्त,मृगजळ भूलवूंगेला ४


लपाछपवी निलांगणी भरिता 

श्वेतश्याम मेघ भरं धांवे सरिता 

कुंजवनी फुलला शुभ्रचाफा ,

चांदणं पसरल हिरव्या पानी.६

शुभ्र अनंत  फुले क्षणोक्षणी ,

जाई-जुई,मोगरा बहरे वनी.

 ७

आमराई चे यौवन सोनपिवळं

निल वर्ण  वितरवे जाम्ब्भूळं ८


राधाबावरी,कृष्णकन्हैया मनी

आषाढ-रासखेळती कुंजवनी

०९

एकादशी जात यात्रा वारकरी   पंढरपुरी विठोबा करकटेवरी

१०

प्रियतुळस,ठेवे कांन्ता शिरी 

पौणिमेंसी यात्रा उधाण भरी

११

भक्त भाविक, माऊली-वासा

गुरु दर्शना लोटांगणे घालीती

१२

धन्य ती गुरु माउलीची महत्ता

भक्तिचरणा लोटे त्याची सत्ता

१३

भव सागर तारवी गुरुमाऊली

इश्वराचा वरदान तीच साउली

१४.

चातुर्मासा, प्रारंभा ह्या मासी 

देवशयन करती हे चार मासी

१५

 उपाशी राहून तो नाही उपवास

आला आषाढात हा चातुर्मास

१६.

उपवास म्हणजे देवपदी वास

मासापासूनघ्या देवपदी वास

१७

जीवांतरी अंती शिवच आहे

प्रत्येकी जीवांत शीव च पाहे




सौ सुलोचना बेलापुरकर देवास

    *अपराजिता*

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू