पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सखी

.                      सखी 

 

इतका राग बरा नव्हे हं सखे!!

अशी काय मागणी होती माझी?? 

एका छत्रीत भिजायचं, एकत्र चालायचं... 

पण तू माझ्यावर शुल्लक कारणाने रागावलेली.

 

माझं असं उशीरा येणं तुला मान्य नाही झालं

म्हणून काय चक्क फेकून द्यायची छत्री

 

पण तुला ठाऊक आहे का?

त्यामुळे काय झालं?

नखशिखांत भिजलेली तू ...

मला जास्तच बिलगुन चालतेयस

आणि तुझी होणारी थरथर माझ्या हातांना जाणवतेय. 

 

नकळतच या वळणावर..... 

आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने...

झाडांवरच्या पर्णसंभाराने आणि फुलांनी

आपल्यावर छान उधळण केली आणि रोमांचित होऊन तू....

माझा हात, किती घट्ट हातात धरलायस कळतंय का तुला?

माझ्या बाहुपाशात तुझी थरथर थांबवायचं

आणि तुला ऊब द्यायचं सामर्थ्य आहे

हेच तुला सिद्ध करायचं होतं का??

तूझा राग जसा पटकन येतो,

तसाच तो पटकन जातोही...हे ठाऊक आहे मला....

 

सौ मंजिरी भातखंडे☔????

   25/6/21

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू