पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

डॉक्टर

" जागतिक डॉक्टर्स डे " निमित्त

                 शुभेच्छा

 

   त्या निमित्ताने सुचलेले काव्य 

 

            " *डॉक्टर "* 

 

शोधत फिरलो देव मी

देवळा देवळांतुनी

कुठे न भेटला , गाभारा रिकामा

झालो अचंबित मनातुनी ॥१॥

करून  पुकारा शोधत होतो

अन् भास जणु झाला

" संकटात जग सारे असता

कसा राहिन मी राऊळा " ॥२॥

जग सारे वेठीस धरले

करोना महामारीने

रूप " डॉक्टर " चे घेऊनि

जणू "धन्वंतरी " धावले ॥३ ॥

थोपविणे ह्या राक्षसाला 

शक्य होते कां कधितरी

होऊनि ऊदार जिवावर 

"डॉक्टर " रूपी देवानेच किमया हि साधली ॥४॥

मुळात वैद्यकीय शास्त्र 

हेच वरदान मानवा 

दैवे लाभल्या कायेस राखण्या

" डॉक्टर " जणु घडविला ॥५॥

निर्मळ , परोपकारी वृत्तीने

हरण्या क्लेश , व्याधी दुसऱ्यांची

 सेवाभाव मनी जागवुनी

ध्येयमय जिवन जगती ॥६॥

ह्रदय, किडनी , पित्ताशय असो वा

अवयव कुठलाही ग्रस्त व्याधिने

जादुच जणु हाती तयांच्या

काळासही थोपविती,कौशल्याने ॥७॥

मात्र असावे ध्यानी आपल्या

हे जिणे दैवी आहे

मर्यादा प्राक्तनाची आपल्या

डॉक्टरी प्रयत्नांसही आहे ॥८॥

असतात स्वार्थी , नतद्रष्ट

ना चुकले क्षेत्र कुठलेहि 

मात्र राखुनी पावित्र्य करति कर्म

 आदर त्यांचा मनात राही ॥ ९॥

    ... ..... प्रदिप राजे , पुणे         International Doctor's Day

                  १ जुलै , २०२१

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू