पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

विरह

" विरह "


मृग नक्षत्रातल्या पहिल्या पावसाच्या सरीने मला रस्त्यावरच गाठले
माझ्या केसांच्या बटांशी खेळणारा मंद वारा, ओल्या मातीचा धुंद सुवास मनाला मोहरवून गेला.
मनाचे फुलपाखरू आठवणीच्या फुलांवरून स्वछंद पणे उड्या मारत थेट माझ्या हृदयात शिरले व हृदयाच्या खोल कप्प्याचे दार हळूच ठोठावले
आणि... तुझ्या गोड आठवणी मोराच्या पिसाऱ्या सारख्या अलगद बाहेर आल्या.
आठवतोय मला तो क्षण, जेव्हा मी तुझ्या निर्मळ, उत्कट प्रेमाचा स्वीकार केला होता.
त्यावेळी देखील असाच रिमझिम पाऊस पडत होता,
तू सोबत होतास म्हणून तो अधिकच लोभस भासत होता.
म्हणतात ना, पहिलं प्रेम वेड असत
अगदी तस्साच पहिला पाऊस देखील
वेडा पिसा असतो
आपल्या साठी तें गोड स्वप्न असतें, तर
इतरांसाठी फक्त बरसणारे पाणी असतें.
निसटले तें सुंदर क्षण, मुठीतल्या वाळू सारखें
आजही पाऊस तसाच बरसतोय.
आणि तुझी आठवण करून देतोय
पाऊस व प्रेमाचं अगदी घट्ट नातं असतं
ज्यांनी खरं प्रेम केलं, त्यांनाच ते समजतं!!!

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू