आनंद ऋतु
आनंद ऋतु
अंगणात पाहून पावसाची पहली सर ,
भिजण्यास मन झालं बहर - बहर !
झाड़ फुले हसली , नाचली,गायली
बघून पावसाला कळी - कळी लाज़ली !
मोर नाचला पिसारा पसरून ,
चकोर झाला मुग्ध पडता पाउस पाहून !
झिरमिर - झिरमिर तालात पाउस ,
रंगात आली गाण्याची . हौस !
झाडं हसली सुवास दरवळला ,
बहरले फुलं आनंद ओसळला !
शेतक-याच्या चेहऱ्यावर स्मित उगवले ,
दाटलेले स्वप्न पुन्हा नव्याने उमगले !
हिरवी गार धरा हिरवळ चौही कड़े,
आकाशाचे सतरंग जामळे हिरवे पिवळे !
पक्ष्यांचा चिवचिवाट मधुर मधुर कलकलाट,
वाऱ्याचा सरसराट पृथ्वी वर भरभराट !
'आनंद ऋतु ' आली लहर - लहर,
भिजण्यास मन झालं बहर - बहर !!!!
सुनीता डगांवकर
देवास