पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कळत-नकळत

कळत नकळत घडली तारुण्यातून चूक

त्यातूनच जन्माला आले एक निष्पाप अर्भक

त्यामुळे कुमातेला आला ताण

विसरली ती मायेचं भान

तिने चक्क कुत्र्या समोरच ठेवलं हे निसर्गाचं दान

ठेवला नाही 'आई' या शब्दाला मान

केला वात्सल्याचा अपमान

जन्मापासूनच आला अर्भकाच्या नशिबी संघर्ष

कुमातेला कसा होईल हर्ष

कुत्र्यांनी तोडले अर्भकाच्या पायाचे लचके

कोणीतरी पाहुनी दूर केले हे आवाज करणारे कुत्र्याचे घोळके

गंभीर परिस्थितीतील अर्भकाला चालू केले उपचार

नवजात अर्भक उगाच झाले येथे लाचार

कलियुगी माणसं कधी शिकतील 'सदाचार'

आपल्या भोगापायी नवजात अर्भकावरती करायलेत वार

अजूनही समजला नाही त्यांना जीवनाचा सार

खरंच परेशान झाली ही धरणी घेऊनी हा भार



कवी- विश्वेश्वर कबाडे उर्फ शुभसंतती, अणदूर,ता.तुळजापूर

भ्रमणध्वनी-9326807480



पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू