पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पाऊस पडतो

पाऊस पडतो..


पाऊस पडतो शहरात..


पाऊस पडतो शहरात

पण अप्रूप काय त्यात?

रस्ते जातात खड्यात

अन् ऋतू संपतो बुजवण्यात।


पाऊस पडतो बंगल्यात

अर्धा जातो पिण्या-पोहण्यात।

अन् अर्धा अंघोळ,चूळ भरण्यात

पाऊस वाहतो सांडपाण्यात।


पाऊस पडतो झोपडीत

जणू लाथ बसते पेकाटात।

वाहून जाते किडुक मिडुक

अन् हयात जाते कवळण्यात।


पाऊस पडतो बातम्यात

तो रमतो Trp खेचण्यात।

चघळला जातो घराघरात

पाऊस असतो मुखामुखात।


पाऊस पडतो,पाऊस उडतो

कोणी हर्षितो,कोणी रडतो।

पण रंक असो वा राव असो

प्रत्येकाचा जीव पावसावर जडतो।

--सुनील पवार..✍️

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू