पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सुखाचा रस्ता आहे का सस्ता

*सुखाचा रस्ता आहे का सस्ता...?*

 

सुख व भावनेचा घनिष्ट संबध आहे. म्हणतात ना.. 'अंधार म्हणजेच प्रकाशाचा अभाव' तसंच काहीसं या सुखाबद्दल म्हणता येईल. खरं तर सुख व दुःखाची व्याख्या ही कशावरून ठरवली जाते. बहुतांश सुख व दुःख हे इंद्रियाशी निगडीत आहे. जे इंद्रियांना आवडते तेच सुख आपण मानतो. मनुष्य प्राण्याला सुख आवडते तर दुःखाचे नाव काढले तरी भिती वाटते. 

 

सुख मग ते विविध गोष्टीत सामावलेले असते..पैसा, संपत्ती, प्रतिष्ठा, किर्ती तर भौतिक सुख यामध्ये गुरफटले आहे. मग ऐषोराम, खाणेपिणे, फिरणे, नटणे थटणे यामध्ये सुख शोधले जाते. बरं हे सगळे मिळाले तरी लोभ हा माणसाला स्वस्थ बसू देत नाही. 

 

मग या सर्व गोष्टी मिळाल्यानंतर एक आंतरिक समाधान मिळते तेव्हाच खरे सुखाची प्राप्ती झाली असं म्हणता येईल. अगदी विमानाचा मालक झाला तरी त्याची चाहत थांबत नाही तोपर्यंत सुख त्याच्या वास्तव्याला येत नाही. 

आता यावरून समजून घ्यायला हवे..सुख हे आंतरिक संपत्ती आहे. मग ही संपत्ती पैशात मोजता येत नाही. माणूस हा विनाकारण नको त्या भौतिक सुखाच्या मागे लागला आहे व दुःख सहजरित्या आपल्यावर ओढवून घेतो. खरं तर माणूस चांगल्या वाईट परिस्थितीमध्ये अविचल राहिला तर आपले स्वास्थ्य योग्य राखतो. ताण तणाव यापासून दूर रहता येते. येणारा प्रत्येक क्षण हा आपल्यासाठी एक आनंद घेऊन आलाय याची जोपर्यंत मनाशी खूणगाठ बांधत नाही तोपर्यंत जीवनाचा खरा अर्थ समजला नाही असंच म्हणावे लागेल. 

 

सुख दुःख हे मानवी जीवनात ऊन सावली सारखे आहेत. इथे प्रत्येक जण दुःखाला पळवण्यासाठी यत्न करत आहे, पण हे करताना तो अधिकाधिक दुःखच ओढवून घेतो. हे समजायला हवे सुखाबरोबर दुःख ही येणारच. जशा गोड कडू या चवी आहेत तसंच हे.. मग ते कसं चाखायचे हे ठरवावे लागते. सुख दुःख हे दोन्ही दागिनेच आहेत हे समजा, सुखा बरोबरच दुःखावर देखील तेव्हढेच प्रेम करा. याचा अर्थ असा आहे की यामध्ये भेदभाव न करता दोन्हीला देखील तेवढ्याच धैर्याने सामोरे जायला हवे..

 

पाण्याने भरलेला आर्धा ग्लास हा काहीणांसाठी आर्धा भरलेला तर काहींसाठी आर्धा रिकामा... याचाच अर्थ दृष्टीकोण..मग हा दृष्टीकोणाचा दृष्टीकोन बदलायला हवा. मग या सुखाच्या मागे लागताना अगदी छोट्या छोट्या गोष्टीत सुख शोधायला शिकले पाहिजे. जसं की कळी उमलताना, सुर्य उगवताना, सागर किनारी बसून फेसाळलेल्या लाटा पाहताना..अश्या क्षणांची गुंफण करत गेले तर!!...

 

खरं तर आत्मबलच हे सुखाचे सामर्थ्य आहे. इतिहासात अशा अनेक घटना आहेत की दुखःला देखिल सुखात परिवर्तन झालेले पाहिले आहे आपण. श्रीराम देखील हसत हसत वनवासात गेलेच होते की.. तर या उलट कंसाकडे सर्व सामर्थ्य असताना देखील मृत्यूचे भय त्याला सतावते. मीरा विष प्राशन करते व अमर होते.

 

????????????????????

 

श्रीकांत दीक्षित.

8805988172

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू